गंभीर गुन्हे असलेल्या युवकाने बळजबरीने विवाह केल्याची तरुणीची तक्रार

 

गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक – स.पो.नि.राहुल वाघ

लासलगाव :प्रतिनिधी

रुई ता.निफाड येथील नाशिक येथे शिक्षण घेत असलेल्या २१ वर्षीय तरुणीला,आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत,बळजबरी विवाह केला व नांदावयास न गेल्याने गुंडांच्या टोळक्याने शस्त्रांचा धाक दाखवत विनयभंग व दहशत माजवल्याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात १० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सदर तरुणीने लासलगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत,फिर्यादी तिचे आई,वडील,आजी,आजोबा असे एकत्र कुटुंब असून त्यांचा शेती व्यवसाय आहे.फिर्यादी नाशिक येथील केटीएचएम कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून कॅनडा कॉर्नर येथे भाड्याने रूम घेऊन राहते.सहा महिन्यापूर्वी संदीप काशिनाथ नागरे रा.डोंगरगाव याच्याशी फिर्यदीची ओळख व नंतर मैत्री झाली.त्यानंतर दि.१० नोव्हेंबर २०२२ रोजी आरोपीने फिर्यादीस लग्न करण्यासाठी दबाव टाकून आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत बळजबरीने फिर्यादी सोबत साई वैदिक केंद्र,अशोक स्तंभ, नाशिक येथे वैदिक पद्धतीने विवाह करून घेतला. विवाहाविषयी कोणाला सांगितल्यास फिर्यादीस व तिच्या आई-वडिलांना मारून टाकेल अशी धमकी दिली.

दि.२२ रोजी फिर्यादीचा भाऊ फिर्यादीस गावी घेऊन आला असता फिर्यादीने सदर प्रकार कुटूंबियांना सांगितला.दि.२४ नोव्हेंबर रोजी संदीप नागरे यांनी मला घेऊन जाण्यासाठी चिथावणी दिल्याने सायंकाळी माझे वडील,आई असे घरी असताना बापू नागरे,अर्जुन सानप,प्रसाद शेरकर रा.डोंगरगाव,चंद्रकांत लुंकड रा.लासलगाव,सागर वाघ रा.नांदगाव,दिनेश तुपे व त्याची पत्नी सोनाली तुपे हल्ली मु.नाशिक,प्रवीण सोनवणे रा.गोंदे ता.सिन्नर व एक अनोळखी महिला हे काळ्या रंगाच्या चार चाकी गाडीमध्ये तसेच दोन-तीन मोटरसायकल घेऊन फिर्यादीच्या घरी आले.प्रवीण सोनवणे,अनिकेत नागरे,प्रसाद शेरेकर,चंद्रकांत लुंकड हातात धारधार शस्त्र घेऊन व सोबत सोनाली तुपे व सोबतची अनोळखी महिला फिर्यादीच्या घरात घुसले व आमचे सोबत संदीप नागरेकडे चल असा आग्रह करू लागले. फिर्यादीने नकार देताच आई वडिलांना मारहाण सुरू केली. चंद्रकांत लुंकड, बापू नागरे हे फिर्यादीचा हात धरून बाहेर ओढू लागले.फिर्यादीच्या आईने हस्तक्षेप करताच प्रवीण सोनवणे व दिनेश तुपे यांनी आईची साडी ओढत,अंगलट करून विनयभंग केला तसेच चापटीने मारहाण केली.सागर वाघ यांनी फिर्यादी च्या वडिलांची गच्ची धरून मारहाण केली.फिर्यादीने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक मदतीला धावून आले असता तुमचे कुटुंबच संपवतो अशी धमकी देत निघून गेले अशी फिर्याद दिली.त्यामुळे सदरहू आरोपींवर लासलगाव पोलीस ठाण्यात मुख्य आरोपीच्या विरोधात अपहरण कलम ३६३ व बलात्कार कलम ३७६ तसेच इतर आरोपींच्या विरोधात १४३,१४७, १४८, १४९, ४५२, ३५४, १०९, ३२३, ५०४ ,५०६, ४/२५ प्रमाणे आर्म्स अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास स.पो.नि.राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ऊ.नि.लहानू धोक्रट, पो.ना.संदीप शिंदे, पो.ना.औदुंबर मुरडनर करीत आहेत.

 

मुख्य आरोपी संदीप काशिनाथ नागरे,अनिकेत उर्फ बापू नंदू नागरे,दिनेश लक्ष्मण तुपे,चंद्रकांत मोहनलालजी लुक्कड,प्रसाद विश्वनाथ शेरे,सचिन उर्फ अर्जुन काशिनाथ सानप,सागर वाघ यांना दि.२८ नोव्हेंबर रोजी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.संदीप नागरे यास दोन डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी तर इतर अटक आरोपी यांना न्यायालयीन कोठडीत नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे

राहुल वाघ

स.पो.नि.लासलगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *