नाशिक:
खान्देश महोत्सवाने खान्देश संस्कृतीचे जतन केले आहे. यानंतरही हा उत्सव अविरत सुरू राहील. पुढील वर्षी या उत्सवाला मी वेळ काढून येईल. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात खान्देशी लोक राहत असल्याने त्यांनी स्वतःचे वेगळेपण जपले असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
नाशिकमध्ये सुरू असलेल्या खान्देश महोत्सवाच्या खान्देश रत्न पुरस्कार वितरण प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यक्रमाला सुभेच्छा देत आगामी काळात कोरोनाच्या नवीन विषाणू शी लढण्यासाठी काळजी घ्या. पुढची लाट येऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, महापौर सतीश कुलकर्णी, विजय चौधरी, लक्ष्मण सावजी, गिरीश पालवे, बाळासाहेब सानप, मनपा आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, हिमगौरी आडके, केदा आहेर, महेश हिरे, रश्मी हिरे आदींसह विविध मान्यवरांसह नाशिककर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
शंकर महादेवन यांच्या गाण्याने रसिक मंत्रमुग्ध, नाशिकरांची तुफान गर्दी. –
प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या गाण्याने रसिक मंत्रमुग्ध झाले. गाणे ऐकण्यासाठी नाशिककरांनी तुफान गर्दी केली होती. खान्देश महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी नागरिकांनी मनसोक्त आनंद घेतला. ओंकार गणपती, सूर निरागस हो, जय जय राम कृष्ण हरी आदींसह अनेक गाण्यांनी नाशिकरांनी गाण्यांवर फेर धरला.
खान्देश रत्न पुरस्कार सोहळा – यावेळी खान्देश रत्न पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला. खान्देशरत्न पुरस्काराचे मानकरी • विशेष पुरस्कारासाठी गुजरातचे भाजपा प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क आयुक्त विजय सूर्यवंशी, दिलीप कोठावदे, संस्कृती नाशिक पहाट पाडवाचे प्रणेते शाहु खैरे, आदर्श शिक्षिका कुंदा बच्छाव शिंदे, कामगार ते यशस्वी उद्योजक बुधाजी पानसरे, उद्योजक मनोज कोतकर, रणजी क्रिकेटपटू सत्यजीत बच्छाव, अपंग संघटनेचे बाळासाहेब घुगे, निरुपणकार संजय धोंडगे महाराज, बहुभाषिक गायिका रायमा रज्जाक शेख (पिहू) व युनायटेड वुई स्टँड एनजीओ सागर मटाले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.