नाशिक : प्रतिनिधी
शिवसेनेचे उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या मातोश्री रजनी भास्करराव बोरस्ते (वय 74) यांचे गुरुवारी (दि.26) अल्पशा आजाराने निधन झाले.
नाशिक अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रजनी बोरस्ते या महिला विकास बँकेच्या माजी संचालिका, तसेच रजनी गृहोद्योगाच्या संचालिका होत्या. पीपल्स बँकेचे माजी संचालक भास्करराव बोरस्ते यांच्या त्या पत्नी होत. त्यांची प्रकृती वृद्धापकाळाने बिघडल्याने मागील शुक्रवारी त्यांना पंडित कॉलनीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर गेल्या सहा दिवसांपासून उपचार सुरू होते. गुरुवारी (दि. 26) दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांचे उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे, दीर व भावजय असा परिवार आहे.
पंडित कॉलनी येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. नाशिक अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत सर्व स्तरांतील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे आदींनी शोक व्यक्त केला.