नाशिक

गॅस मागणी वाढल्याने संभ्रम

घरगुती पुरवठा सुरळीत, उद्योग क्षेत्रात चिंता

नाशिक : प्रतिनिधी
शहरात गॅस सिलिंडरच्या अचानक वाढलेल्या मागणीमुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
इराण-इस्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सिलिंडर बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काही ठिकाणी गॅस एजन्सी कार्यालयांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी गॅस पुरवठा करणार्‍या कंपन्यांच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शासनाच्या 9 मार्चच्या आदेशानुसार गॅस वितरणासाठी प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला असून, सर्वप्रथम घरगुती वापरासाठी, त्यानंतर अत्यावश्यक सेवांसाठी आणि शेवटी व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रासाठी गॅस पुरवठा केला जाणार आहे.
घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून, वितरणही नियमित सुरू असल्याचे आयुष प्रसाद यांनी सांगितले. घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर पथके नियुक्त करण्यात आली असून, हॉटेल किंवा इतर ठिकाणी घरगुती सिलिंडरचा गैरवापर आढळल्यास नागरिकांनी तहसीलदारांकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Confusion due to increased gas demand

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

8 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

8 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

8 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

8 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

8 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

8 hours ago