मुंबई : राज्यातील आगामी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी करण्याबाबत कॉंग्रेसच्या 1 व 2 जून रोजी शिर्डी येथे होणार्या राज्यस्तरीय पदाधिकार्यांच्या शिबिरात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली.
अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या उदयपूर येथील संकल्प शिबिरातील निर्णयानुसार राज्यात कॉंग्रेस पक्षसंघटनेत एक व्यक्ती, एक पद या तत्त्वाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. राज्याचे पक्षाचे प्रभारी पाटील यांच्या उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी टिळक भवनात प्रदेश कॉंग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक झाली. अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या धर्तीवर महाराष्ट्रातही दोन दिवसांचे राज्यस्तरीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. 1 व 2 जून रोजी शिर्डी येथे हे शिबीर होत आहे. राज्यात पुढील काही महिन्यांत होऊ घातलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी करायची किंवा कसे, या संदर्भात शिबिरात चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.
गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…
नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी आल्याने…
नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…
नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…
जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…
निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…