नाशिक: काँग्रेस ला एका मागून एक धक्के सुरूच असून, काँग्रेस च्या प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी आज नवी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शिवसेना पक्षात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदार संघात त्यांना काँग्रेस ने उमेदवारी दिली नव्हती तेव्हापासूनच त्या नाराज होत्या, त्या काँग्रेस सोडतील अशी चर्चा होती, अखेर आज त्यांचा प्रवेश सोहळा झाला. त्यांच्या सोबत रंजना बोराडे, दीपक दातीर यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. माजी खासदार हेमंत गोडसे, यांच्यासह स्थानिक मंडळी दिल्लीत होती, हेमलता पाटील यांनी काँग्रेस सोडल्याने काँग्रेस ची स्थिती आणखी खालावली आहे, महिला काँग्रेस च्या वंदना पाटील या पण शिंदे गटाच्या वाटेवर आहेत.