काँग्रेसला धक्का, हेमलता पाटील शिंदे गटात

नाशिक:  काँग्रेस ला एका मागून एक धक्के सुरूच असून, काँग्रेस च्या प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी आज नवी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शिवसेना पक्षात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदार संघात त्यांना काँग्रेस ने उमेदवारी दिली नव्हती तेव्हापासूनच त्या नाराज होत्या, त्या काँग्रेस सोडतील अशी चर्चा होती, अखेर आज त्यांचा प्रवेश सोहळा झाला. त्यांच्या सोबत रंजना बोराडे, दीपक दातीर यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. माजी खासदार हेमंत गोडसे, यांच्यासह स्थानिक मंडळी दिल्लीत होती, हेमलता पाटील यांनी काँग्रेस सोडल्याने काँग्रेस ची स्थिती आणखी खालावली आहे, महिला काँग्रेस च्या वंदना पाटील या पण शिंदे गटाच्या वाटेवर आहेत.

Bhagwat Udavant

Recent Posts

केवळ चर्चा, बोलणी कधी?

केवळ चर्चा, बोलणी कधी? शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

1 hour ago

मालेगावच्या त्या हॉटेलमध्ये भाजीत आढळले झुरळ

नांदगाव: प्रतिनिधी मालेगाव येथील हॉटेल शिवा पंजाब येथे भाजीमध्ये झुरळ आढळून आले या संदर्भात व्यवस्थापक…

21 hours ago

न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल, या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून

न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…

23 hours ago

नर्मदे हर

नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…

1 day ago

संकोच

*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…

1 day ago

बीडचा बिहार आणि सरकारचा बधिरपणा!

*बीडचा बिहार आणि सरकारचा बधिरपणा!* *लेखिका : सीमाताई मराठे* धुळे. मो. 9028557718   लोकशाही प्रणालीत…

1 day ago