सिडको: विशेष प्रतिनिधी
मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोविंद नगर परिसरात सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकाम साईटवर काम करतांना चौदाव्या मजल्यावरुन पडुन बांधकाम कामगारांचा मृत्यु झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
याबाबत अधिकृत माहिती अशी की गोविंद नगर परिसरातील आरडी सर्कल येथे या इमारतीचे बांधकाम चालु आहे याच बांधकाम वर सेंट्रिंगचे काम चालु असताना सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास विश्वजीत विश्वास (वय २०मुळ रहाणार नावतरा जि नदीया पश्चिम बंगाल) हा कामगारल१४ मजल्यावर सेंट्रिंगचे काम करत असताना सेंट्रिंगची लोखंडी प्लेट सटकली आणि ती थेट बांधकाम कामगाराच्या अंगावर पडली ती थेट लोखंडीप्लेटसह जमीनीवर पडला आणि तो जागीच मृत झाला. याठिकाणी बांधकाम करणा-या कामगारांच्या सुरक्षिततेच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने हा अपघात झाल्याची चर्चा सुरु होती याबाबत मुंबई नाका पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास मुंबई नाका पोलिस करीत आहेत
सुरक्षा उपायांचा अभाव
नाशिक मनपा हद्दीत विविध ठिकाणी गगनचुंबी इमारतीचे बांधकाम सुरू आहे ठिकाणी बांधकाम करण्यासाठी लागणारा कामगार वर्ग हा बहुतांशी राजस्थान,मध्यप्रदेश गुजरात,पश्चिम बंगाल आदी परराज्यातुन आणले जातात मात्र या कामगारांच्या सुरक्षेच्या कोणतीही उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे गेल्या वर्षभरात शंभरहून अधिक बांधकाम कामगारांचे अपघाती मृत्यू झाले आहे भविष्यातील या घटना रोखण्यासाठी कामगार उपायुक्तांसह पोलिस कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे