मालेगाव : भरधाव जाणार्या कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात सोयगाव येथील महिला ठार झाली. महामार्गावरील सायने खुर्द शिवारात हा अपघात झाला. ज्योती सिद्धार्थ आहिरे (22, रा. आंबेडकर चौक, सोयगाव) ही महिला आपल्या नातेवाईका समवेत एमएच. 15 एएक 4581 या दुचाकीने जात होती. त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात येणार्या कंटेनरने धडक दिली. या धडकेत आहिरे रस्त्यावर पडून गंभीर जखमी होऊन मयत झाल्या. या प्रकरणी प्रकाश गंगाराम बोराळे (वय 57, रा. जळकू) यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.