नाशिक

मोहदरी घाटात कंटेनर दुभाजकावर; वाहतूक ठप्प

तीव्र उतार व वळणाचा अंदाज चुकल्याने अपघात

सिन्नर : प्रतिनिधी
नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहदरी घाटातील धोकादायक वळणांमुळे पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली. मंगळवारी (दि. 3) सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या सुमारास तीव्र उतारावरून येणारा अवजड कंटेनरचालकाचा ताबा सुटल्याने थेट दुभाजकावर चढला. या अपघातामुळे सिन्नरहून नाशिककडे जाणारी वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली.
सिन्नरकडून नाशिककडे जात असताना मोहदरी घाटाच्या शेवटच्या टप्प्यात चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला.
तीव्र उतार आणि अचानक येणार्‍या वळणाचा अंदाज न आल्याने कंटेनर थेट दुभाजकावर जाऊन धडकला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, महामार्गावरील एका बाजूची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करण्यात आला. त्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर वाहतूक संथगतीने पूर्ववत करण्यात पोलिसांना यश आले.

शेवटचा टप्पा ठरतोय ‘डेथ ट्रॅप’

नाशिककडे उतरताना मोहदरी घाटाचा शेवटचा टप्पा अत्यंत धोकादायक ठरत आहे. या ठिकाणी उतार जास्त असून, वाहनांचा वेगही वाढलेला असतो. अचानक येणार्‍या वळणाचा अंदाज न आल्याने वाहनांचे नियंत्रण सुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यापूर्वीही या ठिकाणी अनेक अपघात झाले असल्याने येथे वेगमर्यादा फलक, रंबल स्ट्रिप्स, अतिरिक्त सुरक्षा बॅरिअर आणि सतर्कता सूचनाफलक तातडीने बसवण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

Containers at Mohdari Ghat on divider; traffic halted

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

7 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

7 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

7 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

7 hours ago