सत्तासंघर्षाची सुनावणी आता 11 जुलैला
नवीदिल्ली : अपात्रतेच्या नोटिसांबाबत सुप्रीम कोर्टात आज जोरदार युक्तीवाद करण्यात आल्यानंतर आता या प्रकरणाची सुनावणी 11 जुलैला होणार आहे. बंडखोर आमदारांना त्यामुळे म्हणणे मांडण्यास 11 जुलैपर्यंतचा वेळ मिळाल्याने त्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तीवाद केल्यानंतर न्यायालयाने सर्व पक्षकारांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. त्यासाठी पाच दिवसांची मुदत दिली असून, उपाध्यक्ष झिरवाळ यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यंांनी अनधिकृत मेलवरुन आलेला अविश्वास कशामुळे नाकारला ? हे कोर्ट जाणून घेणार असून, त्यानंतरच यावर सुनावणी घेतली जाईल, न्यायालयाच्या या निर्णयामुळे मात्र बंडखोर आमदारांना 11 जुलैपर्यंत आता दिलासा मिळाला आहे.