– नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी
नाशिक – (विशेष प्रतिनिधी)
मनपाच्या लाचखोर शिक्षणाधिकारी श्रीमती सुनिता धनगर यांच्यासह लिपीक नितीन जोशी यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दोघांच्यावतीने जामीन अर्ज दाखल करण्यात आले असून त्यावर ९ जून रोजी सुनावणी होणार असल्याने शिक्षणाधिकारी धनगर यांच्यावर मध्यवर्ती कारागृहात जाण्याची नामुष्की ओढावली आहे.
बडतर्फ मुख्याध्यापकाकडून ५५ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी शिक्षणाधिकारी श्रीमती धनगर यांच्यासह दोघांना पकडण्यात आले होते. या कारवाईनंतर घरझडतीत धनगर यांच्या निवासस्थानी ८५ लाख रुपये तसेच ३२२ ग्रॅम सोन्याचे दागिने मिळुन आले होते. तसेच श्रीमती धनगर यांच्या बँक खात्यात एकुण ३० लाख १६ हजार ६२० रूपये ऐवढी रक्कम असल्याचे आढळून आली होती. या व्यतिरिक्त धनगर यांच्या फ्लॅट व प्लॉटची माहिती तपास पथकाच्या हाती लागली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस संदीप घुगे निरीक्षक अधिक तपास करीत आहे.