नाशिक

लाचखोर शिक्षणाधिकारी श्रीमती धनगर यांना न्यायालयीन कोठडी

– नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी
नाशिक – (विशेष प्रतिनिधी)
मनपाच्या लाचखोर शिक्षणाधिकारी श्रीमती सुनिता धनगर यांच्यासह लिपीक नितीन जोशी यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दोघांच्यावतीने जामीन अर्ज दाखल करण्यात आले असून त्यावर ९ जून रोजी सुनावणी होणार असल्याने शिक्षणाधिकारी धनगर यांच्यावर मध्यवर्ती कारागृहात जाण्याची नामुष्की ओढावली आहे.
बडतर्फ मुख्याध्यापकाकडून ५५ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी शिक्षणाधिकारी श्रीमती धनगर यांच्यासह दोघांना पकडण्यात आले होते. या कारवाईनंतर घरझडतीत धनगर यांच्या निवासस्थानी ८५ लाख रुपये तसेच ३२२ ग्रॅम सोन्याचे दागिने मिळुन आले होते. तसेच श्रीमती धनगर यांच्या बँक खात्यात एकुण ३० लाख १६ हजार ६२० रूपये ऐवढी रक्कम असल्याचे आढळून आली होती. या व्यतिरिक्त धनगर यांच्या फ्लॅट व प्लॉटची माहिती तपास पथकाच्या हाती लागली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस संदीप घुगे निरीक्षक अधिक तपास करीत आहे.
Ashvini Pande

Recent Posts

पावसाळ्यात होणारे पोटाचे आजार

अन्नविषबाधा ः दूषित अन्न खाल्ल्यामुळे उलटी, जुलाब, पोटदुखी आदी त्रास होतो. जुलाब व डायरिया ः…

20 seconds ago

पावसाच्या सरींनी भिजलेल्या हिंदी चित्रपट गाण्यांचा मनमोहक प्रवास

वसाच्या सरी आणि रिमझिम फुहारांनी प्रत्येकाचे मन मोहरून जाते. काळ्याकुट्ट ढगांमधून झरझरत बरसणार्‍या पावसाच्या थेंबांमध्ये…

15 minutes ago

दशकपूर्ती डिजिटल इंडियाची

हा वर्षांपूर्वी आम्ही इतर कोणीही प्रवेश न केलेल्या एका क्षेत्रात आत्मविश्वासाने वाटचाल सुरू केली. भारतीय…

18 minutes ago

शहरात तीन हजार किलो प्लास्टिक जप्त

20 लाखांचा दंड; 403 जणांवर कारवाई नाशिक : प्रतिनिधी प्लास्टिक प्रकरणी छोट्या विक्रेत्यांवर पाच हजारांची…

38 minutes ago

मालमत्ता लिलावाचा फुसका बार

21 मिळकतींसाठी एकही खरेदीदार नाही; सातबार्‍यावर नाव टाकणार नाशिक : प्रतिनिधी थकबाकी भरा, अन्यथा मालमत्तांचा…

47 minutes ago

गुजरातच्या धर्तीवर कांद्याला अनुदान द्या

कांदा उत्पादक शेतकर्‍यांची मागणी लासलगाव : वार्ताहर कांद्याच्या बाजारभावात होणारी घसरण लक्षात घेता गुजरात सरकारने…

1 hour ago