ठाणे:
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणात न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे,
आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी आज ठाणे कोर्टामध्य सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने आव्हाड यांच्यावरील जामीन अर्जाचा निर्णय राखून ठेवला होता. अखेर विनयभंग प्रकरणी जामीन मंजूर केला आहे. अटी आणि शर्तींवर जामीन मंजूर केला आहे.