बाप्पाच्या मूर्तीवर कारागीर फिरवताहेत अखेरचा हात

लासलगाव : वार्ताहर
लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे पंधरा दिवस शिल्लक राहिले असून, लासलगाव येथील रसाळ आर्ट या गणपती कारखान्यामध्ये गणरायाच्या मूर्तींवर कारागीर अखेरचा हात फिरवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गणपती कारखान्यात एक ते चौदा फुटांपर्यंत मूर्ती तयार केल्या जात असल्याने लासलगाव परिसरासह नाशिक, अहिल्यानगर, धुळे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील गणेश मंडळे येथून गणरायाची मूर्ती घेऊन जातात. त्यामुळे आता लासलगावचे नाव कांद्याबरोबर लाडक्या बाप्पाच्या मूतीर्र् तयार करण्याच्या कामामुळे राज्यात झाले आहे.
सन 1893 पासून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली, तेव्हापासून राज्यासह देशात तसेच विदेशातही लाडक्या बाप्पाचे भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला आगमन होते आणि अनंत चतुर्दशी बाप्पाचे विसर्जन केले जाते, असा हा नऊ ते दहा दिवसांचा गणेशोत्सव सोहळा गणेशभक्तांकडून उत्साहात साजरा केला जातो. यामुळे हिंदू धर्मामध्ये या गणेशोत्सवला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
गणेशोत्सव सोहळ्यासाठी लासलगाव येथील रसाळ आर्ट या गणपती कारखान्यात गेल्या 36 वर्षांपासून अहोरात्र मेहनत घेत लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई यांसह इतर रूपातील गणरायाच्या मूर्ती बनवण्याचे काम सुरू आहे.
या मूर्तींवर मोहक रंग चढविणे, गणपतीच्या अंगावरील दागिन्यांवर बारीक कलाकुसर करणे आदी कामे पश्चिम बंगाल येथील कारागीर मोठी मेहनत घेऊन करत असतात. त्यामुळे या सुंदर आकर्षक मूर्ती खरेदीसाठी दोन महिने अगोदर लगबग पाहायला मिळते. घरगुती गणेशमूर्ती घेण्यासाठी, बुकिंगकरिता एक महिना अगोदरपासूनच सुरुवात झाल्याचे कारखान्याच्या संचालिका सुशीला रामदास रसाळ सांगत आहेत.

हिंदू धर्मामध्ये
गणरायाच्या पूजनाला प्रथम महत्त्व दिलेले आहे आणि या गणरायाचे आगमन लवकर होणार आहे, यासाठी आवडीची लाडक्या बाप्पाची मूर्ती खरेदी करण्यासाठी आम्ही आलो आहे. प्रत्येक मूर्ती बघितली तर त्यावर केलेले बारीक कलाकुसरीचे काम मनमोहन आहे, या ठिकाणी आम्ही अनेक
गणरायाच्या मूर्तीचे फोटो मोबाइल कॅमेर्‍यात कैद केले आहे.
– श्वेता मालपाणी, गणेशभक्त

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *