घराघरात स्वराज्याचा मावळा तयार करा: करण गायकर

 दिंडोरीत स्वराज्य पक्षाचा मेळावा

नाशिक : प्रतिनिधी
दिंडोरी लोकसभा, विधानसभा निवडणुका जिंकायच्या आहेत. त्यासाठी घराघरात स्वराज्याचा मावळा तयार करण्याचे काम स्वराज्याच्या पदाधिकार्‍यांनी करावे, असे आवाहन स्वराज्यचे प्रदेश संपर्कप्रमुख करण गायकर यांनी केले.
स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी तालुक्यात स्वराज्य पक्षाचा भव्यप्रवेश सोहळा व पदाधिकारी नियुक्ती सोहळा स्वराज्य प्रदेश संपर्कप्रमुख करण गायकर यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी सांस्कृतिक भवन,दिंडोरी येथे  झाला.
या मेळाव्यासाठी स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र  सचिव शिवाजी मोरे,राज्य कार्यकारणी सदस्य विजय वाहुळे, नवनाथ शिंदे,पुष्पाताई जगताप,सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ जाधव,उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख मनोरमाताई पाटील,शेतकरी आघाडी जिल्हा संपर्कप्रमुख भारत पिंगळे,संजय तुपलोंढे, महेश हिरे,वलखेड ग्रामपंचायत सरपंच विनायक शिंदे,सदस्य मंगेश जाधव,नगरसेवक गणेश बोरस्ते,अनिकेत बोरस्ते रेखा पाटील रागिणी जाधव रेखा जाधव त्यांच्या प्रमुख उपस्थित होते.
दिंडोरी लोकसभा व विधानसभा स्वराज्य पक्ष मोठ्या ताकदीने लढणार असून, तालुक्यासह आजूबाजूच्या परिसरात स्वराज्य पक्षाची ताकद जर आपल्याला वाढवायची असेल तर आपल्याला प्रत्येक घराघरात स्वराज्याचा मावळा हा तयार करावा लागेल,त्याचबरोबर स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी महाराजांच्या संकल्पित गाव तिथे शाखा घर तिथे स्वराज्याचा मावळा या अभियाना खाली प्रत्येक गावात स्वराज्य पक्षाची शाखा तयार करण्यासाठी आजपासून आपण सर्वांनी कामाला लागायचे आहे.
दिंडोरी तालुक्यातील सर्व राजकारणी हे सोयीनुसार आपआपले राजकारण करत असतात साखर कारखान्याची निवडणूक कोणी लढायची, बाजार समितीच्या निवडणूक कोणी लढायच्या,आमदारकी खासदारकीला कोणी उभं राहायचं हे सर्व ही राजकीय मंडळी ठरवून राजकारण करत असतात आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरतात म्हणून या सर्व लोकांना सक्षम पर्याय म्हणून आपण स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून एक चांगलं सुसंस्कृत राजकारण या तालुक्यात आणणार आहोत आणि हे साध्य करण्यासाठी सर्व पदाधिकार्‍यांनी प्रयत्न करायचे आहे.
या तालुक्याला आतापर्यंत अनेक आमदार, खासदार झाले मोठ-मोठे पद मिळाली परंतु तालुक्याचा विकास करण्यात ही सर्व लोक अपयशी ठरली आहे. तालुक्यात कुठेही जा सर्व खराब झालेली रस्ते बघायला मिळतील, आतापर्यंत तालुक्याच्या ठिकाणी शेतकर्‍यांच्या शेतीमालाला विकण्यासाठी एक मोठी बाजारपेठ उभी केली नाही,तरुणांच्या हाताला काम मिळावे म्हणून एवढा मोठा इंडस्ट्रियल झोन असताना सुद्धा चांगले मोठे उद्योग या तालुक्यात येऊ शकले नाही हे सर्व या लोकप्रतिनिधींच अपयश असल्याने या सगळ्या गोष्टी पासून तालुक्यातील सर्वसामान्य जनता ही वंचित राहिली आहे म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी व सर्व सामान्य जनतेला हक्काचा नवीन पर्याय म्हणजे स्वराज्य पक्ष आहे.  असे गायकर म्हणाले.
राज्य कोर कमिटी सदस्य विजय वाहुळे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वराज्याची आचारसंहिता ही पाळली पाहिजे,  स्वराज्य पक्ष मोठा करण्यासाठी प्रयत्न करूया. असे सांगितले. उत्तर महाराष्ट्र सचिव शिवाजी मोरे,नवनाथ शिंदे,पुष्पाताई जगताप, मनोरमाताई पाटील,यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिंडोरी तालुका प्रमुख सचिन जाधव,दिंडोरी तालुका संघटक वैभव वडजे,युवक तालुकाप्रमुख समाधान कातोरे यांसह अनेक पदाधिकार्‍यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिक जाधव यांनी केले. आभार तालुका संघटक वैभव वडजे यांनी मानले.

दिंडोरी तालुका कार्यकारिणी पुढील प्रमाणे

दिंडोरी उप तालुका अध्यक्ष – दीपक नाठे,शहर प्रमुख- संदीप बोरस्ते,उपशहर प्रमुख- तुषार पिंगळ,
तालुका कार्याध्यक्ष- सूरज थेटे,  विद्यार्थी तालुकाप्रमुख दिंडोरी- ऋषिकेश वडजे तालुका संपर्कप्रमुख- बबन जागीरदार.युवक तालुका उपाध्यक्ष- गोपीनाथ मुरकुटे, संपर्कप्रमुख- योगेश प्रकाश पाटील,  युवक तालुका कार्याध्यक्ष- गौरव खुर्दळ,  युवक तालुका संघटक्- विशाल केशव जाधव,                              युवक तालुका उप प्रसिद्धी प्रमुख- ईश्वर वाटपाडे युवक तालुका सचिव- सागर त्रंबक नाठे.                                                       युवक तालुका उपसंपर्क प्रमुख – आकाश जाधव.महिला आघाडी तालुकाप्रमुख- नेहा ताई नाठे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *