नाशिक

हॉटेल व्यावसायिकास दमदाटी करून दहशत निर्माण करणार्‍या चौघांविरुद्ध गुन्हा

सिडको : विशेष प्रतिनिधी
छायानिवास परिसरातील हॉटेल व्यावसायिकास दमदाटी करून खंडणी मागणार्‍या चौघांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हॉटेल व्यावसायिक दिनेश दिलीप दासवाणी (वय 40, रा. छायानिवास, एम. जी. रोड, नाशिकरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे.

फिर्यादी दासवाणी आपले हॉटेल ‘किरण’ बंद करून घरी निघाले असताना, संशयित आरोपी राजू शेख व अजीम शेख, तसेच त्यांच्यासोबत असलेले अजून दोन साथीदार रिक्षा (एमएच 15- एके 5576)मधून घटनास्थळी आले. त्यांनी शिवीगाळ करत, ‘आम्ही नाशिकरोड रेल्वे स्टेशनचे भाई आहोत,‘असे म्हणत दमदाटी केली. त्यांपैकी आरोपी अजीम शेख याने हातातील धारदार लोखंडी शस्त्र दाखवून ‘तुम्हाला या परिसरात व्यवसाय करायचा असेल तर दहा हजार रुपये हप्ता द्या,‘ अशी धमकी दिली. ‘आज वाचलात, पुढच्या वेळी जीव घेतला जाईल,‘ असे म्हणत दहशत निर्माण केली व सर्वजण निघून गेले. या तक्रारीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक शिंदे व माळी करीत आहेत.

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

4 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

4 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

4 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

5 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

5 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

5 hours ago