नाशिक : पतंग उडविण्याच्या वादातून दोघा भावांनी शेजार्यावर चाकूने वार करून हल्ला केल्याची घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
बिल्डिंगच्या टेरेसवर मुलांना घेऊन पतंग उडवत असताना समजावून सांगण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकावर दोघा भावांनी चाकूने वार केले. फिर्यादी नरेंद्र सुधाकर जाधव (रा. शिवाजी पार्क अपार्टमेंट, शिवाजीनगर) हे घरी असताना त्यांच्या बिल्डिंगमधील आरोपी रोहन नितीन पाटील (वय 25) हा बिल्डिंगच्या टेरेसवर गल्लीमधील मुलांना घेऊन पतंग उडवत होता. जोरजोरात भोंगा वाजवत होता. त्यानंतर फिर्यादी कामावर जाण्यासाठी निघाले असता, आरोपी रोहन पाटीलने त्याचा भाऊ प्रेम पाटील याला बोलावून घेतले आणि त्यांनी नरेंद्र जाधव यांच्यावर चाकूने वार केले. फिर्यादीच्या डोक्याला जखम झाली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : बळजबरीने घरात घुसून महिलेचे तोंड दाबून गळ्यातील मणीमंगळसूत्र, एक ग्रॅम सोन्याची नथ, असा एकूण चाळीस हजार रुपये किमतीचा ऐवज घरासमोर राहणार्या मुन्ना प्रकाश निसाळ (रा. तवलीफाटा, पेठरोड) याने चोरून नेल्याची घटना राहुलनगर नाल्याजवळ विद्यानगर, मखमलाबाद येथे घडली. याप्रकरणी लक्ष्मी ब्रिजेशकुमार (वय 25) यांनी फिर्याद दिल्याने म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक : सिडकोच्या महाराणाप्रताप चौकात राहणारी युवती मैत्रिणीकडे जाते, असे सांगून बेपत्ता झाली. तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती सापडली नाही. तिला कुणीतरी फूस लावून पळविल्याचा संशय आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार बनतोडे करीत आहेत.
नाशिक : सातपूरच्या श्रमिकनगर येथील विकी गोरक्षनाथ शर्मा (वय 40, रा. सिद्धीप्रकाश रो- हाउस, रूम नंबर 5, हिंदी शाळेजवळ) यांना साहिल रवी सावळे, श्रावण सावळे (दोघे रा. वृंदावन गार्डनसमोर, श्रमिकनगर) या दोघा भावांनी काहीही कारण नसताना विनाकारण मारहाण केली. धारदार शस्त्राने वार केले. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अहिरे करीत आहेत.
नाशिक : जुन्या नाशिकच्या कथडा भागात राहणार्या संकेत भारत डांगरे (वय 29) याने सुलभ शौचालयाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या झाडास धोतराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नाशिक : हॉस्पिटल बांधण्यासाठी माहेरून वडिलांकडून पैसे आणावेत, या कारणासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याने विवाहितेने याप्रकरणी गंगापूर पोलिसांत फिर्याद दिली. लासलगाव रोड, ता. निफाड येथील माहेर असलेल्या विवाहितेचा दि. 1 जून ते 9 डिसेंबर या कालावधीत पती, सासू, सासरे, मामेसासरे, नणंद यांनी छळ केला. फिर्यादीला माहेरून पैसे आणले नाहीत म्हणून वेळोवेळी टोमणे मारत उपाशी ठेवले. फिर्यादीला धमकी देऊन तुझी नोकरी व डिग्री सर्व जाईल, असे म्हणत तिचा मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून अखेर विवाहितेने गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक मधुकर कड करीत आहेत.
Crime Diary
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…