भरवस फाटा येथे चाकूचा धाक दाखवत पेट्रोल पंपावरून २६ हजार लुटले
विंचूर : प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या भरवस फाटा (ता.निफाड) येथील साईबाबा पेट्रोल पंपावर चाकूचा धाक दाखवत सव्वीस हजार रुपये चोरून नेल्याची घटना दि.२१ रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे.या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरवस फाटा येथील साईबाबा पेट्रोल पंपावर रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास पेट्रोलपंपावर झालेल्या जमा खर्चा बाबत सेल्समन बंडु व प्रितम यांचे कडुन हिशोब घेत असतांना कोणीतरी ऑफिसचे शटर वाजवले म्हणुन त्यांनी शटर उघडले असता एक इसम जबरदस्तीने ऑफिस मध्ये घुसला त्याचे पाठोपाठ इतर ४ इसम ऑफिस मध्ये घुसले. तेव्हा त्यातील एक इसमास दिपेश व बंडु यांनी ओळखले, तो मरळगोई येथील सोपान निवृत्ती जगताप हा होता.
यातील एकाने त्याचे खिशातील चाकु काढुन बंडुचे पोटाला लावला. तसेच सोपान जगताप याने त्याचे खिशातून चाकु काढुन दिपेशला चाकुचा धाक दाखवुन त्याचे कडील कॅश काउंटरची चावी हिसकावून घेतली. त्यानंतर त्याने कॅश काउंटर उघडुन त्यात ठेवलेले रोख रक्कम २६३०० रुपये काढुन घेतले. त्या नंतर त्यातील दोन इसमांनी पेट्रोल अँँटो मशीनचे मॉनिटर उचलून खाली आपटून फोडले व काउंटरवर ठेवलेले पैसे मोजण्याचे मशिनही उचलून खाली जमिनीवर आपटुन फोडून नुकसान केले. सोपान जगताप आणि त्यासोबत असलेले इतर ४ इसमांनी ऑफिसचे शेजारी असलेल्या रूम मध्ये जावून रुम मधील सीसीटीव्ही कॅमे-यांचे डीव्हीआर बॉक्सच्या वायरी चाकूने कापुन डीव्हीआर मशीन सोबत घेऊन “तुम्ही जर कोणाला काही सांगितले तर तुम्हाला मारुन टाकु ” असा दम देऊन पळून गेले. घडलेल्या घटनेने परिसरातील नागरिकांच्या मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. संशयित आरोपी फरार आहेत.याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहा पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शना खाली लासलगाव पोलीस पुढील तपास करीत आहे.
घरात घुसला, अंगावर पेट्रोल टाकून पेटवले अन नंतर केले असे काही... नाशिक: …
काँग्रेस मेळावा नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा…
कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अभोणा उपबाजारात शेतकर्यांंनी गुरूवारी सुमारे 700 ट्रँक्टर मधून 15 हजार…
नाशिक : प्रतिनिधी गेल्या तीन चार महिन्यांपासून हा तिकडे चालला तो तिकडे चालला अशा अफवा…
नाशिक : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला होता.आगामी स्तानिक स्वराज संस्थेच्या…
नाशिक : प्रतिनिधी वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला…