दिंडोरी पोलिसांची कामगिरी
दिंडोरी ः प्रतिनिधी
बालाजी अॅक्वा, अवनखेड (ता. दिंडोरी) येथून फिर्यादीच्या मालकीची इलेक्ट्रिक रिक्षा (एमएच 15- एचएच 9564) रात्रीच्या सुमारास कोणीतरी चोरून नेली. याप्रकरणी दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासात दिंडोरी पोलीस ठाण्याच्या पथकाने नाशिक-कळवण रोडवरील सीसीटीव्ही कॅमेर्यांची पडताळणी केली असता, हा गुन्हा सराईत गुन्हेगार मनोज जिभाऊ बागूल (वय 27, रा. हिंगवे, पो. पाळे, ता. कळवण) याने केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. आरोपी हा मोबाइल न वापरता लपूनछपून वावरत होता. त्याचा शोध घेत असताना खबर्यामार्फत आरोपी ठाणापाडा (ता. सुरगाणा, जि. नाशिक) येथील जंगलात लपून बसलेला असल्याची माहिती मिळाली.
दिंडोरी पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याचा ठाणापाडा येथील जंगलामध्ये शिताफीने पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने ही इलेक्ट्रिक रिक्षा चोरली केल्याची कबुली दिली. त्यास अटक करून त्याच्याकडून फिर्यादीची चोरी केलेली इलेक्ट्रिक रिक्षा जप्त करण्यात आली.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण किरणकुमार सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, पोउनि सुदर्शन आवारी, पोउनि अल्ताफ शेख, पोलीस अंमलदार विश्वनाथ काकड, पराग गोतुरणे, भरत कनोज, दिलीप राऊत, अविनाश आहेर यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी केली.
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…