नाशिक

गुन्हेगार प्रेम थोरातला अटक

गुंडाविरोधी पथकाची यशस्वी कारवाई

सिडको विशेष प्रतिनिधी :- देवळाली कॅम्प येथील बुखारी हॉटेलजवळ, दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी कोयत्याने जिवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या प्रेम थोरात या सराईत गुन्हेगाराला अखेर गुंडाविरोधी पथकाने अटक केली आहे.
या घटनेत फिर्यादी आदित्य भालेराव व त्याच्या मित्रावर जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपीने कोयत्याने हल्ला करून गंभीर दुखापत केली होती. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा घडल्यानंतर आरोपी फरार होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, उपआयुक्त किरणकुमार चव्हाण व सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी गुंडा विरोधी पथकाला आरोपीला तातडीने अटक करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार तपोवन परिसरात सापळा रचून, प्रेम गोपाल थोरात (वय 20, रा. हाडोळा, आनंद रोड, देवळाली कॅम्प) याला अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय गांगुर्डे, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनिल आडके, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले व सुनीता कवडे यांनी केली.

 

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

6 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

6 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

6 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

6 hours ago