सीआरपीएफ भरतीदरम्यान डमी प्रशिक्षणार्थी ताब्यात

 

नाशिक : वार्ताहर
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सीआरपीए भरतीप्रक्रियेत डमी विद्यार्थी घुसवण्याचा प्रकार उघड झाला आहे. मूळ विद्यार्थ्याऐवजी दुसराच भरतीप्रक्रियेसाठी हजर असल्याचे बायोमॅट्रिक तपासणीत उघड झाल्याने दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची भरतीप्रक्रिया नाशिकरोडमधील जेलरोडच्या मैदानावर सुरू आहे.
शनिवारी दुपारी उमेदवार अरशद अहमद याची बायोमॅट्रिक तपासणी घेतली असता त्याचे हाताचे ठसे तसेच यापूर्वी लेखी परीक्षा घेतलेले तळहाताचे ठसे व भरतीप्रक्रियेदरम्यान घेतलेले तळहाताचे ठसे हे जुळत नसल्याचे लक्षात आले. तसेच लेखी परीक्षेच्या वेळेस घेतलेला फोटो व आज घेतलेला फोटोही वेगळेच असल्याचे दिसून आले. त्यामुळे लेखी परीक्षा दिलेली व्यक्ती व ग्राउंड परीक्षेस आलेला आरोपी अरशद अहमद या दोन व्यक्ती वेगवेगळ्या असून, त्या दोघांनी केंद्र शासनाची फसवणूक केली म्हणून उपनगर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.
सीआयएसएफचे भरत कौशिक (वय 28, रा. नेहरूनगर, नाशिकरोड) यांनी दिलेल्या तक्रारीन्वये अरशद अहमद (वय 24, रा- घर नं. 33, होलाराम कॉ. समोर, कस्तुरबानगर, साधू वासवानी रोड, शरणपूर) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा उपनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *