पोलिसांनी जप्त केला लाखोंचा मद्य साठा
नाशिक : नाशिकच्या उत्पादन शुल्क विभागाने गोवा निर्मित लाखो रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केलाय. धक्कादायक बाब म्हणजे कुरीयरच्या सिल बंद ट्रॅक मधून हि मद्याची अवैध वाहतूक केली जात होती. नाशिकमधून धुळ्याकडे हि अवैद्य मद्याची वाहतूक केली जात असताना द्वारका भागात कार्यवाही करत १४ लाखांचे विदेशी दारूचे आणि बियरचे बॉक्स आणि वाहन असा एकूण २४ लाखांचा मुद्देमाल महाराष्ट्र उत्पादन शुल्क नाशिक विभागाच्या पथकाने कार्यवाही करत जप्त केला आहे.
यात कार्यवाहीत एका जनाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. हा मद्यसाठा आणखी कुठल्या जिल्ह्यात जाणार होता…? किंवा नाशिकमध्ये कुठल्या विक्रेत्याकडे नेण्यात येणार होता..?माल कुणाच्या माध्यमातून विक्री साठी आणला जात होता..? याबाबत अधिक तपास सुरु असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग नाशिक अधीक्षक मनोहर अंचुळे यांनी दिली आहे. नाशिक उत्पादन शुक्ल विभागाच्या या कारवाईने मद्य तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…