भारतावर सायबर हल्ला ! अनेक सरकारी वेबसाइट हॅक

 

ठाणे : ठाणे पोलिसांसह भारतातील अनेक सरकारी वेबसाइट हॅक करण्यात आल्याने खळबळ उडाली . दोन दिवसांपूर्वी नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची वेबसाइट हॅक करण्यात आली होती . त्यापाठोपाठ ठाणे पोलिसांची अधिकृत वेबसाइट हॅक करण्यात आली आहे . मलेशियातील हॅक्टिविस्ट ग्रुप ड्रॅगन फोर्सच्या आवाहनानंतर देशभरातील अनेक वेबसाइट हॅक करण्यात आल्या आहेत . या ग्रुपने जगभरातल्या मुस्लिम हॅकर्सना भारतावर सायबर अटॅक करण्याचे आवाहन केले . नूपुर शर्मा यांचे वक्तव्य , मंदिर मशीद वादाच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आले आहे . मुस्लिम धर्मीयांची माफी मागा , हाच संदेश हॅकर्सनी वेबसाइट हॅक केल्यानंतर दिला आहे . पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , या ग्रुपनं ‘ opspatuk ‘ किंवा प्रतिहल्ला हे ऑपरेशन सुरू केले असून , त्याचा अर्थ स्ट्राईक बॅक असा होतो . त्यामुळेच भारतातील अनेक सरकारी वेबसाइट हॅक झाल्या आहेत . मुस्लिम धर्मीयांची माफी मागा , हा एक संदेश सर्व वेबसाइटवर देण्यात येत आहे . यातून सरकारकडे असलेली अतिशय गुप्त आणि महत्त्वाची माहिती चोरली जाण्याची देखील शक्यता आहे . गेल्या काही दिवसांपासून देशात मंदिर – मशीद मुद्दा चांगलाच तापला आहे . तसेच मोहम्मद पैगंबर यांच्यावरील टिप्पणी प्रकरणामुळे देशात अनेक ठिकाणी हिंसाचार भडकला आहे . एआयएमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांच्यासह मुस्लिम समाजातील दिग्गजांनी देशात मुस्लिम असुरक्षित असल्याची वक्तव्य केली आहेत . असा होता मेसेज ठाणे शहर पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर लिहिलेल्या संदेशात याची नोंद करण्यात आली आहे . हॅकर्सनी लिहिले आहे की , भारत सरकार , तुम्ही इस्लामच्या संदर्भात वारंवार अडथळे आणता , तुम्हाला सहिष्णुता दिसत नाही , जगभरातील मुस्लिमांची लवकरात लवकर माफी मागा , अन्यथा आम्ही शांत बसणार नाही . “

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *