उत्तर महाराष्ट्र

नांदूरशिंगोटेत ऐन दिवाळीत सशस्त्र दरोडा

5 ते 6 लाखांचा ऐवज लंपास
सिन्नर ः प्रतिनिधी
तालुक्यातील नांदूर शिंगोटे गावात रविवारी (दि. 23) मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत सुमार 5 ते 6 लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला आहे. ऐन दिवाळीत या सशस्त्र दरोड्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून पोलिसांपुढे या दरोडेखोरांना गजाआड करण्याचे आव्हान उभे राहीले आहे.

नाशिक पुणे मार्गावर राहत असलेल्या सुभाष कराड हे नुकतेच रविवारी सायंकाळी मुंबई येथून गावी आलेले होते. दरोडेखोरांनी रात्री 12:30 वाजे दरम्यान त्यांच्या बंगल्याच्या बाजूला प्रवेश केला. हा सर्व प्रकार शेजारी असलेल्या मेंढपाळ यांनी पाहिला मात्र त्यांना वाटले मुंबई येथून पाहुणे आले आहे. त्यामुळे घरचे माणसे असतील मात्र सदरच्या दरोडेखोरांनी कराड यांचा सेफ्टी डोअर लावलेला होता व खिडकीची काच बाजूला करून आतमध्ये डोकावून बघितले असता कराड यांचा मुलगा सुभाष कराड व सायली सुभाष कराड हे अभ्यास करत असताना दिसले. हे पाहून दरोडेखोरांनी तेथून काढता पाय घेतला.
हा प्रकार कराड यांच्या लक्षात येताच त्यांनी आसपासच्या लोकांना जागे केले. त्यानंतर दरोडेखोरांनी थोड्याच अंतरावर असणाऱ्या राजेंद्र मारुती शेळके यांच्या बंगल्याकडे आपला मोर्चा वळवला. या ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये सर्व थरार कैद झाला असून या ठिकाणी त्यांना सेफ्टी डोअर असल्यामुळे त्यांच्या हाती काही लागले नाही. घराबाहेर झोपलेल्या बबन शेळके नामक व्यक्तीच्या वडिलांचा उशाला ठेवलेला मोबाईल व बॅटरी घेऊन दरोडेखोरांनी तेथून पोबारा करत आपला मोर्चा जवळच असणाऱ्या संतोष गंगाधर कांगणे यांच्या घराकडे वळवला. दरवाजांच्या कड्या तोडून आत प्रवेश करत सामानाची उलथापालथ केली. संतोष कांगणे यांच्या आई रतनबाई यांना शांत बसा अंगावर असलेले दागिने काढून द्या असे सांगितले व त्यांच्या मानेला चाकू लावून सर्व दागिने काढून घेतले. त्यानंतर दरोडेखोरांनी आपला मोर्चा गंगाधर कांगणे यांच्या रूम कडे वळविला व त्या ठिकाणी कांगणे हे झोपलेले असताना त्यांनठीने मारझोड केली व तुमच्याकडे काही जी रक्कम ती काढून द्या अशी धमकी दिली.
कांगणे यांनी त्यांच्याकडील साडेतीन लाख रुपये रोख रक्कम व दहा तोळे दागिने काढून दिल्याचे सांगितले. दरोडेखोरांनी इंदुबाई शेळके यांच्या कानातील सोन्याची टॉप्स,गळ्यातील दागिने काढून घेतले. त्यावेळी घरामध्ये असलेल्या रमेश शेळके यांच्या पत्नी अर्चना शेळके, आई, मुले हे सर्व हा प्रकार बघत होते. सर्व दागिने ओढून घेतल्यानंतर त्यांनी या ठिकाणी रमेश शेळके यांच्या पायाला वीट फेकून मारली शेळके. या घटनेत शेळके यांची रोख रक्कम व दागिने मिळून साधारणतः अंदाजे पाच ते दहा लाख रुपये इतका ऐवज गेला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
हा प्रकार नांदूरशिंगोटे गावात कळताच नांदूर शिंगोटे गावचे अनेक लोक व पोलिस या ठिकाणी पोचले मात्र तोपर्यंत चोरटे या ठिकाणाहून पसार झाले होते. यावेळी पोलिस उपनिरीक्षक निफाड, सोमवार तांबे सिन्नर येथील पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सिन्नर एमआयडीसी येथील पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी व वावी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर कोते व सहकारी कारवाई करून दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. या ठिकाणी डॉग स्पॉट व ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते.

Bhagwat Udavant

Recent Posts

ठाकरे गटाच्या या बड्या नेत्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल

खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदगाव आमिन शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब…

7 hours ago

मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल

  मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…

11 hours ago

ट्रॅपची माहिती होती, तर सतर्क का केले नाही?

मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…

11 hours ago

साप्ताहिक राशिभविष्य

दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…

12 hours ago

महापालिका जिंकायचीय, वाद टाळून कामाला लागा

मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…

12 hours ago

कांदा उत्पादकांवर ओढावणार आर्थिक संकट?

दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता लासलगाव : समीर पठाण गेल्या काही…

12 hours ago