दर्शना पवारच्या खून प्रकरणातील फरार हंडोरेस अटक

नाशिक: एमपीएससी परीक्षेत यशाची कमान गाठल्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी बनलेल्या कोपरगावच्या दर्शना पवार चा पुण्यातील राजगड येथे मृतदेह आढळून आला, तिचा खून झाल्याचे उघड झाले असून तिच्यासोबत असलेला राहुल हंडोरे हा गायब झाला होता, अखेर त्याला आज मुंबई वरून पुण्याला येत असताना पोलिसांनी अटक केली त्यामुळे आता दर्शनाच्या खुनाचे गूढ उकलणार आहे,

, सिन्नर तालुक्यातील शहा या गावातील असलेल्या हंदोरेच्या शोध घेण्यासाठी पोलीस शहा गावी पोचले  होते मात्र तो आढळून आला नाही, शहा येथील असलेला हंडोरे याचे वडील शेती करतात, तो देखील नागरी सेवा परीक्षेची तयारी करत आहे, दर्शना ही पुण्यात राहत होती, ती ज्या मैत्रिणी सोबत राहत होती तिला तिने आपण सिहगड येथे फ़िरायला जात असल्याचे सांगितले होते. तिचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी सापडला, ती हंडोरे सोबत या ठिकाणी गेली होती, असे सीसीटीव्ही फुटेज आढळून आले, त्यामुळे प्रथमदर्शनी संशयाची सुई हंडोरे वर जाते, कारण घटना घडल्यापासून तो देखील गायब होता,, पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी सिन्नर तालुक्यातील शाह गावाचा असल्याने येथे पण त्याचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही,सर्वसामान्य कुटुंबातील असलेल्या हंडोरे च्या घराला कुलूप आहे.

लग्नाला नकार दिल्याने खून

राहुल हंडोरे याला दर्शनाशी लग्न करायचं होते, मात्र दर्शनाचा विवाह दुसरीकडे ठरवला होता, राहुलने याबाबत लग्न करण्याची विनंती केली होती, मात्र त्याला नकार दिल्याने राहुलने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते,

हंडोरे चे शहा येथील घर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *