नाशिक

जेलरोडला प्रभाग अठरात दत्त जयंती उत्साहात

श्री मूर्तीला 51 लिटर दुधाचा पंचामृत अभिषेक

नाशिक : प्रतिनिधी
जेलरोड येथील प्रभाग अठरातील वसंत विहार येथील श्रीकृष्ण मंदिरात श्री दत्तात्रय प्रभू महाराज जयंती उत्सव भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. भगवान दत्तात्रय प्रभू जन्मोत्सव प्रभागातील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत विविध धार्मिक विधीद्वारे केला गेला.
प्रभाग अठरातील भाजपचे माजी नगरसेवक तथा नाशिकरोड विभागाचे सभापती विशाल संगमनेरे यांच्या सर्वज्ञ सोशल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी हा उत्सव आयोजित केला जातो. यंदाही मोठ्या उत्साहाने जन्मोत्सव साजरा केला गेला. यावेळी आ. राहुल ढिकले यांनी भगवान दत्तात्रयांचे दर्शन घेत त्यांच्या हस्ते धार्मिक विधी
पार पडला.
जन्मोत्सव सोहळ्यासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्वपक्षीय पदधिकार्‍यांनी हजेरी लावत भगवान कृष्णाचे दर्शन घेतले. दरम्यान, बुधवारी (दि.3) सायंकाळी दुपारी चार वाजता वसंत विहार येथून भव्य रथयात्रा मिरवणूक काढण्यात आली. या यात्रेत प्रभागातील हजारो नागरिकांनी सहभाग घेत शोभा वाढवली. रात्री नऊ वाजेपर्यंत ही रथयात्रा
सुरू होती.
दरम्यान, गुरुवारी (दि.4) सकाळी नऊ वाजता दत्तात्रय कवच सामुदायिक पठण करण्यात आले. तद्नंतर श्री मूर्तीला 51 लिटर दुधाचा पंचामृत अभिषेक करून आरती घेण्यात आली. यावेळी दत्तात्रयांचा जयघोष करण्यात आला. दर्शनासाठी पुरुषांसह महिलांची लक्षणीय गर्दी सकाळपासूनच श्रीकृष्ण मंदिरात होती. यावेळी उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

आकर्षक सजावटीने वेधले लक्ष

वसंत विहार येथील भगवान श्रीकृष्ण मंदिराला सुंदर अशी फुलांची सजावट केल्याने वातावरण प्रसन्न होते. शिवाय, येणार्‍या प्रत्येकाचे लक्ष या सजावटीद्वारे वेधले जात होते.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

11 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

11 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

11 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

11 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

11 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

12 hours ago