नाशिक: प्रतिनिधी
टोळक्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आकाश धनवटे याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
शहरात गुन्हेगारी काही केल्या कमी होण्यास तयार नाही. गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असून आज सकाळी टोळक्याने कोयत्याने केलेल्या हल्ल्यात गंगापूर रोड ते पंडित कॉलनी या रस्त्यावर आकाश धनवटे हा जात असताना अथर्व दाते याने त्याच्या चार ते पाच साथीदारांच्या मदतीने हल्ला केला. या हल्ल्यात आकाश गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
पोलीस हल्लेखोर यांचा शोध घेत आहे.