आस्वाद

फसवे मृगजळ

’फसवे मृगजळ’ हा अनिता बोडके लिखित एक मराठी गझलसंग्रह आहे. या संग्रहात कवयित्रीने गझलेच्या माध्यमातून जीवनातील भ्रम आणि भावनिक छटा मांडल्या आहेत. गझल ही त्यांच्या मनाची प्रांजळ अभिव्यक्ती असून, तंत्राचे निकोप सौष्ठव व आशयाचे शालीन सौदर्य यांच्या बेमालुम सरमिसळीतून अनिता यांची गझल आकार घेते. त्यांच्या गझलेची भाषा सहजसोपी व संवादी असून, शेरशायरी उत्तम आहे. त्यामुळे ती वाचताना रसिक मनाला मंत्रमुग्ध करणारी आहे.
आपल्या आतील कलेतून मुक्तपणे व्यक्त होणे हाच कविचा मूळ स्वभाव असतो. कविता- गझलनिर्मिती ही फार वेगळी प्रक्रिया आहे. आपल्या वेदना- संवेदना आणि चिंतन यांच्या मंथनातून बाहेर येणारं सुंदर रत्न म्हणजे कविता/गझल. जशा प्रकारचे मंथन तशाप्रकारची निर्मिती असणार आहे. मंथनातून अमृतही बाहेर पडते अन् विषही येईल. तशा अनेक दिव्य गोष्टीही हातात येणार आहेत. हे मंथन करताना मात्र आपल्या अंतर्मनात परिणामांची जाणीव आधीपासून ठेवायला हवीय.
अनिता बोडके हे नाव कविता तसेच गझल या दोन्ही प्रकारांत सर्वांना माहीत आहे. अफाट हिंमत आणि अतुलनीय इच्छाशक्ती या दोन घटकांची झलक तिच्या लिखानातून वांरवार दिसून येते. अनिता बोडके या एक संवेदनशील कवयित्री, गझलाकार आहेत. आपल्या मनातील भावना, जाणिवा योग्य शब्दांत, शेरात मांडण्याचे त्यांचे कसब वाखाणण्यासारखे आहे. त्यांनी पाहिलेली, ऐकलेली, अनुभवलेली आणि कल्पिलेली विचारबीजे ’फसवे मृगजळ’ या गझल संग्रहातून उगवून आली आहेत.
ओठी उद्या जगाच्या येईल नाम माझे
मी बोलणार नाही, बोलेल काम माझे
असे म्हणत त्यांनी साहित्यक्षेत्रात दमदार पाऊल ठेवले आहे. गझल ह्या समाजप्रबोधन तर करतातच, पण निसर्ग, प्रेम, जिव्हाळा, बालपण यावरही भाष्य करतात.
मंदिराचा बाबरीचा प्रश्न मोठा वाटतो
की भुकेचा भाकरीचा प्रश्न मोठा वाटतो
किंवा
या जगापासूनी दूर लपवा मला
बोलते लेक गर्भात जगवा मला
असे ज्वलंत विषय असणारे शेर त्यांच्या संवेदनशील मनाची ओळख करवून देतात. काव्याच्या माध्यमातून समाजक्रांती घडविणे नाही तर काव्याची सहजता जपत अनिताताईंच्या गझलेतून समाजप्रबोधन समोर येते.
येते कुठून बळ अंगी तुझ्या कळेना
तू पार संकटांना करते क्षणात आई
अशा अनेक शेरमधून त्याची जीवनाकडे पाहण्याची, लढण्याची हिंमत, जिद्द दिसते. जीवनात संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला येतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनुष्याने झुंज देत राहिले पाहिजे. कारण संघर्षाशिवाय यश मिळत नाही. आयुष्याचा खरा अर्थही संघर्षातूनच समजतो. आज समाजात अनेक समस्या दिसून येतात. त्या समस्यांना घाबरून मागे हटण्यापेक्षा त्यांचा सामना करणे आवश्यक आहे. जे लोक संकटांचा धैर्याने सामना करतात, तेच पुढे इतिहास घडवतात.
संघर्ष करताना मनात सकारात्मक विचार असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नकारात्मक विचार माणसाला कमकुवत करतात, तर सकारात्मक विचार त्याला उभारी देतात. त्यामुळे परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी मनोधैर्य गमावू नये. आपल्या ध्येयावर ठाम विश्वास ठेवून प्रयत्न करत राहिल्यास यश निश्चित मिळते. इतिहासातील अनेक महान व्यक्तींनी संघर्षातूनच आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या जीवनात नवे आदर्श निर्माण करू शकतो. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील अडचणींना सामोरे जात झुंज दिली पाहिजे. कारण शेवटी झुंजण्याचाच इतिहास घडतो.
अनिताताईंच्या गझला वाचताना त्यांच्यातील सकस आशय आणि अपेक्षित कलाटणी यांचा बेजोड संगम आढळतो. फसवे मृगजळ या गझलसंग्रहात मानवी जीवनातील भ्रम, मोह, वेढा यांची कथा सांगण्याचा कवयित्रीने प्रयत्न केलेला आहे. आपण एखाद्या गोष्टीमागे सतत धावत असतो किंवा ती मिळविण्यासाठी झटत असतो. पण त्या गोष्टीची सत्यता जेव्हा समजते, तेव्हा फार उशीर झालेला असतो. ती गोष्ट केवळ एक मृगजळ, भ्रम, फसवणूक असल्याचे लक्षात येते. मृगजळ हे जीवनातील चुकीच्या अपेक्षा, अधांतरी स्वप्न किंवा भ्रामक कल्पना या ध्येयानंतर होणार्‍या जाणिवेचे प्रतिनिधित्व करते.
या गझलसंग्रहातील अनेक उत्तमोत्तम गझलांमधून आपल्याला त्यांच्या विशिष्ट लेखनशैलीची,त्यांच्या संवेदनशील मनाची, आत्मभान आणि समाजभान याची ओळख होते. वाचकांनी अवश्य हा गझलसंग्रह घेऊन त्यातील गझलांचा आस्वाद घ्यावा.

Deceptive mirage

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

4 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

4 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

4 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

4 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

4 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

4 hours ago