नाशिक : अश्विनी पांडे
आज दीप अमावास्या. चातुर्मासातील पहिली अमावास्या आषाढ अमावास्या असते. आषाढ एकादशीपासून चातुर्मास सुरू झाला आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार आषाढ महिन्यातील दीप अमावास्या समाप्तीनंतर श्रावण मासाला प्रारंभ होणार आहे. श्रावणातला जवळजवळ प्रत्येक दिवस काही ना काही उपवासाच्या सणांशी संबंधित असतो. आज दीप अमावास्या प्रारंभ होणार असून, या वर्षी 28 जुलै रोजी दीपपूजन केले जाणार आहे. या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते. दिवा लावला जातो आणि दानधर्म केले जाते. दीप अमावास्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार, या वर्षी अमावास्या तिथी बुधवार, 27 जुलै रात्री 9 वाजून 11 मिनिटांनी सुरू होईल. जी 28 जुलै रोजी रात्री 11 वाजून 24 मिनिटांपर्यंत आहे. या दिवशी गुरुपुष्ययोगासोबत अमृतसिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धीसारखे महायोग आहेत. लोक या दिवशी उपवास देखील करतात. अग्निप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला दीपपूजन केले जाते.
मांसाहारींची पंचाईत
आज दीप अमावास्या त्याचप्रमाण गटारीदेखील आहे. दीप अमावास्येनंतर श्रावण मासाला प्रारंभ होणार असल्याने श्रावणात मांसाहार घेण्याचे टाळले जाते. त्यामुळे मांसाहारप्रेमी खवय्यांकडून गटारीचे औचित्य साधत मांसाहारावर ताव मारला जातो. मात्र, यंदा गटारी गुरुवारी आल्याने मांसाहार करणार्यांची पंचाईत झाली. त्यामुळे अनेकांनी कालच गटारी साजरी केली. त्यामुळे दीप अमावास्येप्रमाणे गटारीही साजरी करण्याची परंपरा आहे.
नांदगाव: प्रतिनिधी मालेगाव येथील हॉटेल शिवा पंजाब येथे भाजीमध्ये झुरळ आढळून आले या संदर्भात व्यवस्थापक…
न्यूरो सर्जन वळसंगकर आत्महत्येला वेगळा अँगल नेमक्या कोणत्या कारणामुळे डॉक्टरांनी घेतल्या गोळ्या झाडून सोलापूर: सोलापूर…
नर्मदे हर ..... लेखक: रुपाली जाधव,सटाणा नर्मदा परीक्रमा पूर्ण करण्याचे स्वप्न गेल्या 2वर्षांपासून मनात घोळत…
*संकोच... लेखिका: अंजली रहाणे/थेटे *संकोच हा वैरी सत्याचा* *संकोच हा घात नात्याचा* संकोच अर्थात संशय…
*बीडचा बिहार आणि सरकारचा बधिरपणा!* *लेखिका : सीमाताई मराठे* धुळे. मो. 9028557718 लोकशाही प्रणालीत…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा अचानक रद्द नेमके काय कारण घडले? नाशिक: प्रतिनिधी राज्याचे…