प्रशासक राजवटीत पूर्णवेळ आयुक्तची जबाबदारी मोठी
नाशिक : गोरख काळे
नाशिक महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली होउन पाच दिवस उलटत असून अद्यापही नाशिक महापालिकेसाठी शासनाकडून आयुक्त मिळालेले नाही. डॉ. पुलकुडवार महिन्याभरापासून मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. प्रशिक्षण पूर्ण करुन पालिकेत परतनार तोच शासनाकडून त्यांची साखर आयुक्त पदी नियुक्त करण्यात आली. प्रभारी आयुक्तची जबाबदारी राधाकृष्ण गमे यांच्यावर असली तरी पालिकेला पूर्णवेळ आयुक्त नसल्याने महिन्याभरापासून महत्वाची कामे रखडल्याचे चित्र आहे. राज्यातील सत्त्तेत असलेली भाजपने पालिका निवडणुकीत विकासाकरिता नाशिकला दत्त्तक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र विकासकामांचे जाउद्या नाशिककरिता पूर्णवेळ आयुक्त मिळ्णार कधी असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे.
……
सध्या पालिकेत पूर्णवेळ आयुक्त नसल्याने बाह्यरिंगरोड सह भूसंपदनाचे काम रखडल्याचे चित्र आहे. यासह विविध विभागातील महत्वाच्या फाइलींचा निपटारा करायचा आहे. हे काम नवीन आयुक्त आल्यावरच होणार आहे. महापालिकेत वर्षभरापासून प्रशासक राजवट लागू आहे. अशावेळी शहराचे प्रमुख म्हणून मुख्य जबाबदारी ही आयुक्ताची असते. पालिके ला पूर्णवेळ आयुक्तच नसल्याने याचा परिणाम होतो आहे. प्रभारी म्हणून गमे यांच्यावर जबाबदारी असली तरी जे महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. ते पूर्णवेळ आलेल्या आयुक्तांकडूनच घेतली जातील. शहरात आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दुष्टीने तयारी करायची आहे. बाह्यरिंगरोड, अंतर्गत रिंगरोड, साधुग्राम मधील कामे, नमामी गोदा प्रकल्प यासह विविध विभागातील कामे महत्वाची आहे. याकरिता पूर्णवेळ आयुक्तच हवे. तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी 2017 साली महापालिका निवडणुकीत शहराच्या विकासासाठी नाशिक दत्तक घेणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु सध्या त्यांच्याच सत्त्ताकाळात नाशिकसाठी साधे पूर्णवेळ आयुक्त मिळ्त नसल्याने आश्चर्य व्यक्त होते आहेे. शहरात भाजपचे तीन आमदार, पालिकेत दिलेली सत्ता एवढे देउनही पालिकेसाठी आयुक्त मिळ्त नसल्याचे चित्र आहे. दरम्यान जेव्हा पालिकेत लोकप्रतिनिधी असतात तेव्हा स्थायी सभा, महासभेद्वारे विविध विकासाचे विषय मार्गी लावले जातात. प्रशासक राजवटीमध्ये सर्व अधिकारी आयुक्तांकडेच असतात. त्याच्याच अध्यक्षतेखाली स्थायी व महासभा होउन विकास कामांसाठी लागणारा निधीसह इतर कामे मार्गी लावली जातात. प्रशासक राजवट असताना कुठेही विकास कामे खंडीत होणार नाही. किंवा नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवेवर परिणाम होनार नाही. याची प्रमुख जबाबदारी प्रशासक म्हणून आयुक्तांची असते. पालिका वर्तुळात आयुक्त नसल्याने अधिकारी कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवणार कोण, कामात सुसूत्रता राखली कशी जाणार असे प्रश्न उपस्थित केले जातायेत.
अधिकाऱ्यांना जावे लागते नाशिकरोडला
डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचा प्रभारी कार्यभार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पाच जिल्हयाची जबाबदारी असताना त्यांच्याकडे नाशिक सारख्या मोठया महापालिकेचेही प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात अली. महसूल कार्यालय नाशिकरोड येथे असून पालिकेतील विविध विभागप्रमुखांना कोणतेही महत्वाचे काम असो किंवा बैठक असो त्यांना थेट नाशिकरोडला जावे लागते. येण्या-जाण्यातच वेळ जात असल्याचे चित्र आहे.