नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या वर्षभरावर आला आहे. त्यासाठी स्वतंत्र तरतूद असली तरी जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रासह तीर्थस्थळांचा विकास करण्याची गरज आहे. त्यांचा विकास करण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून 100 कोटी रुपयांची तरतूद करा, अशी मागणी करतानाच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पुढील वर्षाच्या नियोजनात 642 कोटी रुपयांची वाढीव मागणी नोंदवली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 11) ऑनलाइन घेतलेल्या बैठकीत अनेक सूचना करण्यात आल्या. बैठकीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे ऑनलाइन तर आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, राहुल ढिकले, दिलीप बनकर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा नियोजन अधिकारी शिंदे, दत्ता आव्हाड आदी उपस्थित होते.
मागील वर्षीपेक्षाही कमी करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन निधीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दृकश्राव्य माध्यमातून झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त करीत प्रथम निधी वाढवून देण्याची मागणी केली. मंत्री छगन भुजबळ यांनी कलाग्रामचा विषय उपस्थित करीत त्यासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली. सिंहस्थात पर्यटनासाठी हे मोठे केंद्र ठरू शकेल, असेही ते म्हणाले.
2026-2027 साठी जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 च्या प्रारूप आराखड्यात विविध क्षेत्रांसाठी निधीची तरतूद करण्यात आली असून, ग्राम क्षेत्राला सर्वाधिक 73.53 टक्के निधी देण्यात आला आहे. ग्राम क्षेत्रासाठी एकूण 464.10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ग्राम क्षेत्रांतर्गत कृषी व संलग्न सेवा यासाठी 111.70 कोटी, ग्रामविकासासाठी 63 कोटी, सामाजिक व सामुदायिक सेवांसाठी 192.05 कोटी, पाटबंधारे व पूर नियंत्रणासाठी 36.50 कोटी तसेच ऊर्जा क्षेत्रासाठी 60.85 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. बिगरग्राम क्षेत्रासाठी 176.65 कोटी रुपये (26.47 टक्के) राखीव ठेवण्यात आले आहेत. यात उद्योग व खाण क्षेत्रासाठी 0.35 कोटी, परिवहनासाठी 59.57 कोटी, सामान्य सेवांसाठी 65.87 कोटी आणि सामान्य आर्थिक सेवांसाठी 50.86 कोटी रुपयांचा समावेश आहे. ‘इतर’ घटकांतर्गत 34.60 कोटी रुपये (5 टक्के) प्रस्तावित असून, नावीन्यपूर्ण योजनांसाठी 24.21 कोटी, मूल्यवर्धन नियंत्रणासाठी 3.45 कोटी आणि लक्ष्यित विकास धोरणासाठी 6.91 कोटी रुपयांची तरतूद करण्यात
आली आहे.
भुजबळ यांची वाढीव निधीची मागणी
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना सन 2025-26 साठी 900 कोटी रुपयांची तरतूद होती. सन 2026-27 साठी ही 691.90 कोटी रुपये मर्यादा शासनाने कळवली आहे. म्हणजे पुढील वर्षासाठी 209 कोटी नियतव्यय कमी करण्यात येणार आहे. मात्र, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचा निधी कमी करू नये, शासकीय यंत्रणांकडून अधिक 642 कोटी इतकी वाढीव निधीची मागणी आहे. त्यानुसार 691.90 अधिक 642 अशी एकूण 1333.90 कोटी इतकी तरतूद करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
महिला आणि बाल रुग्णालयाच्या कामकाजाला वेग यायला हवा. संदर्भ रुग्णालयात 100 खाटांचे रुग्णालय आणि त्यासाठी असलेल्या साहित्याची खरेदी लवकर करण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळही मंजूर केल्यास आरोग्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी होईल.
– देवयानी फरांदे, आमदार, मध्य नाशिक
Demand for additional funds of Rs 642 crore for district planning
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…