देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
येथील शिगवे बहुला येथील बाबू मुन्ना कनोजिया, वय 53 वर्ष, राहणार बेरड गल्ली, शिंगवे बहुला या एक्स सर्विसमन इसमाने स्वतःचे सिंगल बोअर लायसन्स्ड रायफल मधून स्वतःचे हनुवटी खालून गोळी मारून घेऊन आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार व त्यांना मिळालेल्या माहतीनुसार सदर इसम गुरुवारी रात्री राहत्या घरी स्वतःच्या हनवटिवर गोळी झाडून आत्महत्या केली असून सदर इसम सतत दारू पिण्याचे व्यसन होते. घरात तो आणि त्याची २५ वर्षे वयाची मुलगी असे दोघेच राहण्यास होते. त्याची पत्नी लहान मुलांना सांभाळण्याचे काम करते. ती कामानिमित्त मुंबई दिल्ली गोवा अशा ठिकाणी तीन महिने, चार महिने जात असते. एक मुलगा असून तो पुणे येथे जॉब करून शिक्षण घेत आहे. सदर बाबत एडीआर दाखल करून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लियाकत पठाण करत आहे.
Ashvini Pandeअश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.