नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहराचा विकास झपाट्याने होत आहे. नाशिक शहराची जगभरात ओळख तंत्रभूमी ते मंत्रभूमी अशी आहे. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत नाशिक शहर वास्तव्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी पोषक आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे या परिसरातील नागरिक नाशिकला गुंतवणुकीसाठी पसंती देताना दिसत आहेत. त्यात आता नाशिकलगत समृद्धी महामार्ग जाणार असल्याने नाशिकचा विकासाची गतीही हायस्पीड असणार आहे. शहरात येत्या २२ ते २५ डिसेंबर चार दिवसीय नरडेको प्रॉपर्टी एक्स्पो होमेथॉनचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनातून चांगले घर घेण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
घराचे स्वप्न साकारण्याची संधी : जयेश ठक्कर
नरेडकोच्या माध्यमातून एकाच छताखाली अनेक प्रॉपर्टीज पाहण्याची नाशिककरांना संधी मिळणार आहे. नाशिक शहराचा सर्वांगीण विकास झालेला आहे. सोयीसुविधायुक्त शहर असल्याने शहरात प्रॉपर्टी घेणे फायदेशीर ठरणारे आहे. तसेच प्रॉपर्टी एक्स्पोच्या ठिकाणी नागरिकांना रोहाऊस, फ्लॅट, शॉप, हॉस्पिटल अशा विविध प्रकारच्या प्रॉपर्टीज पाहता येणार आहेत. यात १५ लाखांपासून ते साडेचार कोटींपर्यंतच्या प्रॉपर्टीच विक्रीसाठी आहेत. विशेष म्हणजे एक्स्पो पाहण्यास येणाऱ्या नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. फक्त नोंदणी करावी लागणार आहे. एक्स्पोच्या माध्यमातून नाशिक शहराचे ब्रॅन्डिंग करण्यात येणार आहे. नाशिक शहरातील वातावरण, धार्मिक भूमी ते वाइननगरी अशी ओळख असलेल्या नाशिक शहराचा जगाच्या नकाशावर चमकत आहे. या एक्स्पोच्या माध्यमातून झळाळी देण्याचे काम बांधकाम व्यावसायिकांकडून करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे, एक्स्पोच्या ठिकाणी विक्रीसाठी असलेल्या प्रत्येक प्रॉपर्टीची रेराअंतर्गत नोंदणी झालेली आहे. त्यामुळे नागरिकांची फसवणूक होणार नाही. प्रॉपर्टीज आवडल्यास खरेदी करण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रिया या ठिकाणी करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे गृहकर्ज घ्यायचे असल्यास त्याच ठिकाणी विविध बँक प्रतिनिधींच्या माध्यमातून एक्स्पोच्या ठिकाणी घेता येऊ शकते.
तसेच एक्स्पोस्थळी विविध मान्यवरांच्या सेमिनारच्या माध्यमातून नागरिकांना गृह खरेदी करताना येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गृह खरेदीवेळी फसवणूक होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी कायदेशीर सल्लागारांकडून मार्गदर्शन ठेवण्याचा प्रयत्न आहे. या प्रॉपर्टीज एक्स्पोचा जास्तीत नागरिकांनी फायदा घ्यायला हवा. यातून त्यांना स्वप्नातील घर खरेदी करण्याची संधी मिळणार आहे तर बांधकाम व्यावसायिकांनाही कोरोनानंतर उभारी मिळणार आहे. नागरिकांनी नरडेकोच्या होमेथॉनला भेट देत आपल्या स्वप्नातील घरात गृहप्रवेश करावा.
गुंतवणुकीसाठी उत्तम डेस्टिनेशन : सुनील गवांदे
नाशिक शहर राज्यातील विकसित शहर आहे. त्यामुळे शहरात प्रॉपर्टीची खरेदी करण्यास शहरातील नागरिकांसह राज्यातील इतर भागातील नागरिकही पसंती देत आहेत, असे नरेडकोचे सचिव सुनील गवांदे यांनी सांगितले. नाशिक शहर हे एज्युकेशन हब, इंडस्ट्रियल हब, धार्मिक हब, पर्यटन हब, खाद्य हब, वाइननगरी आहे. त्याचप्रमाणे राज्यातील अतिविकसित असलेल्या पुणे, मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या जवळील शहर असल्याने नाशकात प्रॉपर्टीची गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचप्रमाणे नाशिक हे सुवर्ण त्रिकोणातील शहर असल्याने सध्या गुंतवणुकीसाठी नाशिकला पसंती देण्यात येत असून, पुणे, मुंबईच्या तुलनेत नाशिकच्या प्रॉपर्टीचे दर कमी आहेत. त्याचप्रमाणे बांधकाम साहित्याचे ४० दर वाढलेले असताना सामान्य नागरिकांच्या बजेटचा विचार करत नाशिक शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी १० टक्के वाढ केली. त्याचप्रमाणे शहरातील बांधकामाचा दर्जा चांगला असून, वातावरण चांगले असल्याने बांधकाम टिकते. त्याचप्रमाणे नाशिकचे प्रत्येक बांधकाम व्यावसायिक साइटवर जात बांधकामाच्या दर्जाबाबात दक्ष असतात. त्यामुळे ज्यांना पहिल्यांदा घर होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोच्या माध्यमातून नागरिकांना विविध भागात असलेल्या प्रॉपर्टीची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे अपल्या बजेटमधील घर निवडणे सोपे जाणार आहे. कोरोना काळात बांधकाम व्यवसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले, मात्र प्रॉपर्टी एक्स्पोच्या माध्यमातून बांधकाम व्यवसायालाही चालना मिळणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी नरेडकोच्या होमेथॉनला भेट देत आपल्या बजेटमधील स्वप्नातील घर खरेदी करावे.