कृष्णा एंझीटेक कंपनीत विजेचा शॉक लागून दोन ठार

कृष्णा एंझीटेक कंपनीत विजेचा शॉक लागून दोन ठार

येवला : प्रतिनिधी

येवला – कोपरगाव रोड वरील नांदेसर शिवारात असलेल्या कृष्णा एंझीटेक कंपनीत विजेचा शॉक लागून दोन कामगार मयत झाले आहे. येवला- कोपरगाव रोड लगत असलेली नांदेश्वर शिवारात कृष्णा एंझी टेक ह्या कंपनीतील दोन कामगार हे त्यांचे काम करत मोठी लोखंडी शिडी लोटत असताना विद्युत तारांचा मोठ्या लोखंडी शिडी ला संपर्क होऊन त्यात दोघांना शॉक लागून प्रवीण नानासाहेब मोहन (३०) राहणार नांदूर तालुका येवला,आप्पासाहेब नामदेव गायकवाड (वय ४३) राहणार बदापूर तालुका येवला हे दोघे मयत झाले असल्याची खबर सुभाष सूर्यभान वाघ यांनी शहर पोलिसात खबर दिली आहे.सदर घटना आज दिनांक २६ रोजी सकाळी ११ :१५ वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस उपनिरीक्षक लोंढे हे अधिक तपास करीत आहेत

One thought on “कृष्णा एंझीटेक कंपनीत विजेचा शॉक लागून दोन ठार

  1. गांवकरी वृत्त पत्राचा मी नियमित वाचक आहे.
    संपादकीय टिम ला विनंती कि आपण ह्या माध्यमातून
    नोकरी विषयक माहिती (छोट्या जाहिराती नव्हे.) अधिकृत जाहिराती प्रसिद्ध कराव्यात.

    आपला…
    ओझरमिग, जिल्हा- नाशिक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *