बदलते तंत्रज्ञान हवाई दलासाठी उपयुक्त

अजयकुमार सुरी: कॉम्बॅट एव्हिएशन विंगच्या 37 व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा
नाशिक ः देवयानी सोनार

मानवरहित ड्रोन, हेलिकॉप्टर महत्त्वाची भूमिका बजावतात. मानवरहित वाहनांचा युद्धभूमीवर वापर आणि प्रशिक्षण महत्त्वाचे असून, सैन्यातील वैमानिकांना आव्हानात्मक परिस्थितीत शत्रूंशी मुकाबला करता यावा, यासाठी प्रशिक्षणातील तंत्रज्ञान बदल आवश्यक आहे, असे आर्मी एव्हिएशनचे महासंचालक कमांडर लेप्टनंट जनरल अजयकुमार सुरी यांनी सांगितले.
भारतीय सैन्य दलाची हवाई तुकडी असलेल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन विंगच्या 38व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा काल गांधीनगर येथे पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कॅट्सचे कमाडंट ब्रिगेडियर संजय वढेरा, उपकमाडंट कर्नल डी. के. चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
गांधीनगर येथे कॉम्बॅट एव्हिएशन विंगच्या 38 व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा पार पडला. आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या प्रशिक्षणार्थी वैमानिकांच्या तुकडीचे 32 वैमानिक देशसेवेत दाखल झाले.
देशसेवेची तळमळ त्यासाठी खडतर प्रशिक्षण घेऊन युद्धभूमीवर जाण्यसासठी सज्ज हवाई दलाचे दिमाखदार आणि शिस्तबद्ध संचलन सोहळा पार पडला. कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन विंगच्या प्रशिक्षण काळात उत्तम कामगिरी करणार्‍या एका नायजेरीयन अधिकार्‍यासह 32 अधिकार्‍यांना कॉम्बॅट हेलिकॉप्टर पायलट एव्हिएशन विंगने सन्मानित करण्यात आले. चित्तथरारक हवाई कसरतीसह प्रत्यक्षात युद्धभूमीवर शत्रूशी मुकाबला करताना जखमी जवानांची सुरक्षितता, प्रसंगावधान राखण्याचे प्रात्यक्षिके उपस्थितांना याप्रसंगी दाखविण्यात आली.
18 आठवड्यांचे लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांचे प्रशिक्षण, 22 आठवड्यांचे हेलिकॉप्टर वैमानिक प्रशिक्षक आणि 23 आठवड्यांचे प्राथमिक रिमोट उड्डाण एअरक्राप्ट सिस्टिमचे (इंटरनल पायलट आणि ऑब्जर्वर) प्रशिक्षण अभ्यासक्रम यशस्वी पूर्ण करणार्‍या एकूण 57 अधिकार्‍यांनी दिमाखदार संचलन केले.


चार महिला प्रशिक्षणार्थी महिला
चार महिला प्रशिक्षणार्थी दीक्षांत सोहळ्यातील महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले. यातील तीन महिलांनी ड्रोन उड्डाणाचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे.
नायजेरीयन सैनिकाचे प्रशिक्षण
मेजर ऑफोडील या नायजेरीयन सैनिकाने वैमानिकाचे धडे भारतीय प्रशिक्षणार्थींसोबत घेतले.

चार महिला वैमानिक सेवेत
कॅप्टन सुजाता आर्या यांचे पती मेजर विवेक सेनेत अधिकारी आहेत. कॅप्टन गौरी महाडिक या मेजर महाडिक यांच्या वीरपत्नी आहेत. यांचे पती देशाची सुरक्षा करताना वीरगती प्राप्त झाली.तसेच अनुमेहा त्यागी आणि मल्लिका नेगी यांचा समावेश होता.


यांना केले सन्मानित
नमन बन्सल यांना सिल्वर चिता ट्रॉङ्गी देऊन सन्मानित करण्यात आले. मेजर अभिमन्यू गनाचारी बेस्ट ऑङ्ग आर्मी हेलिकॉप्टर इस्ट्रक्टर कोर्स मेजर प्रदीप अग्रवाल ट्रॉफी देऊन सन्मानित केले. मेजर नवनीत जोशी आणि लेफ्टनंट कर्नल पुनीत नागर यांना बेसिक रिमोटली पायलटेड एअरक्राप्ट सिस्टम मेरिटमध्ये प्रथम आल्याने ब्रिगेडियर के. वी. शांडील एस. एम. ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले.


चेतक, चिताला पर्यायी हेलिकॉप्टर लवकरच
बदलते तंत्रज्ञान हवाई दलासाठी पोषक असून, हवाई साहित्य अत्याधुनिक गुणवत्तापूर्ण आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे. सियाचिन-मलेशिया बॉडर्सवर महत्त्वपूर्ण उपयोगी ठरणारे अत्याधुनिक हेलिकॉप्टर आहेत. रात्रीच्यावेळी आणि कोणत्याही वातावरणात वापरता येणारे. रुद्र, चेतक, चिता, प्रचंड हे उत्कृष्ट असे हेलिकॉप्टर उपयोगी आहेत. लवकरच चेतक, चिता यांना पर्यायी कमी वजनाचे हेलिकॉप्टर हवाई दलात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावतील, असे सुरी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *