नाशिक

श्री मार्कंडेय पर्वतावर जाण्यास भाविकांना बंदी

प्रशासनाने सोमवती अमावस्येच्या यात्रेला परवानगी नाकारली

दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यातील श्री मार्कंडेश्वर पर्वतावर येत्या सोमवारी (दि. 26) सोमवती अमावस्येनिमित्त भरणार्‍या यात्रेला यंदाही प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. पावसामुळे दरड कोसळण्याच्या शक्यतेने भाविकांना पर्वतावर जाण्यास मनाई केली आहे.
कळवणचे उपविभागीय दंडाधिकारी अकुनुरी नरेश यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अन्वये हा आदेश जारी केला आहे. 2023 मध्ये सोमवती अमावस्येच्या दिवशी मार्कंडेय पर्वतावर दरड कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत सहा ते सात भाविक जखमी झाले होते.
सोमवती अमावस्येनिमित्त मार्कंडेश्वर पर्वतावर दर्शनाला जाण्यासाठी व यात्रा भरविण्यावर गेल्या दोन वर्षांपासून बंदी घालण्यात येत आहे. पर्वतावर पहिल्या टप्प्याजवळ असणारा लोखंडी पूल अरुंद व कमकुवत असल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. पर्वतावर जाण्यासाठी पायवाटाही निसरड्या आहेत. बारीतील रस्ता अरुंद असून, बारीमध्ये यात्रा लावण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे पुढील दुर्घटना टाळण्यासाठी यात्रेला व मार्कड पर्वतावर मंदिरात जाण्यासाठी परवानगी देऊ नये, असा अभिप्राय तहसीलदार व पोलिस निरीक्षकांनी दिला होता. त्यानुसार प्रशासनाने हा बंदीआदेश जारी केला आहे.
नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातून तसेच बाहेरच्या प्रांतातून हजारोंच्या संख्येने भाविक मार्कडेय ऋषी पर्वतावर दर्शनासाठी येत असतात. यापूर्वीही गर्दी, तसेच अवघड वाटेमुळे भाविक पाय घसरून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मार्कंडेय पर्वतावर भाविकांची गर्दी होऊ नये, लोकांच्या जीवितास हानी होऊ नये, तसेच अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उपविभागीय दंडाधिकारी यांनी हा निर्णय घेतल्याचे आदेशात म्हटले आहे.

पहिल्या पायरीवर दर्शनव्यवस्था

 फक्त भाविकांना पहिल्या पायरीवर दर्शन घेण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे.

वाहनतळ व पार्किंगची व्यवस्था मुळाणे व गोबापूर गावात करण्यात येणार आहे.

कोणतीही जीवित व वित्तहानी होणार नाही याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी,

असे आदेशात नमूद केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी तत्काळ करण्यात

येऊन वेळोवेळी अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला केल्या आहेत.

 

Gavkari Admin

Recent Posts

कांद्याचे भाव गडगडणार

कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…

13 hours ago

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल

यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…

15 hours ago

वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही….

  वधूचा घागरा बदलून न दिल्याने  नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…

1 day ago

मृत्यू पश्चातही आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच

मृत्यू नंतरही  आदिवासींच्या नशिबी  पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…

1 day ago

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाचे आज अधिवेशन

सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त  आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…

1 day ago

त्र्यंबकेश्वर श्रावणी सोमवारी भाविकांसाठी रा. प.कडून 33 जादा बसेसची सोय

नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…

1 day ago