नाशिक

गाभाऱ्यामधील कर्मचाऱ्यांच्या लोटा-लाटी मुळे भाविक त्रस्त

सप्तशृंगी गड  : वार्ताहर

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी हजारो भाविक मोठ्या संख्येने व मनोभावाने सप्तशृंगी गडावर येत असतात, भाविक म्हणजे साक्षात दैवतच परंतु हल्लीच्या काळात भाविकांना भाविकांसारखी मंदिरामध्ये वागणूक दिली जात नाही,भाविक आई भगवतीच्या ओढीने हजारो किलोमिटर प्रवास करून दर्शनासाठी सप्तशृंगी गडावर येत असतो,भाविक गडावर आल्यानंतर पाचशे पायऱ्या चढून आई भगवतीच्या दर्शनाला जातो मंदिरात गेल्यानंतर आई भगवतीचे भव्य दिव्य रूप आपल्या डोळ्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करत असतो व आई भगवतीला मनोभावे आपले सुख दुःख सांगतो परंतु हल्लीच्या काळात आई भगवतीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मंदिर गाभाऱ्यांमध्ये भयंकर हेळसांड व लोटा लाटीने हाल होताना दिसून येत आहे
मंदिर गाभाऱ्यामध्ये भाविकांची गर्दी शांतपणे काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व महाराष्ट्र सुरक्षा बल कर्मचारी असतात परंतु त्यांच्याकडून भाविकांना भाविकांसारखी व्यवस्थित वागणूक दिली जात नाही,
भाविक आई भगवतीच्या स्वयंभूमूर्तीला डोळे भरून पाहण्यासाठी धडपड करत असतो व सुख शांतीसाठी हात जोडेपर्यंत गाभाऱ्यातील महाराष्ट्र सुरक्षा बल व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी भाविकांच्या हाताला धरून भयंकर लोटा लाटी करून बाहेर कढुन देतात,
शिर्डी सारख्या भव्य दिव्य संस्थांनमध्ये लाखो भाविक रोज दर्शनासाठी येतात व शांतपणे दर्शन घेतात,त्या शिर्डी संस्थांमध्ये भाविकांची काधीच हेळसांड होत नाही ह्याच धरतीवर सप्तशृंगी देवी संस्थान मंदिरामध्ये असे नियोजन का होऊ शकत नाही असा ग्रामस्थांमध्ये संताप जनक प्रश्न ट्रस्ट प्रशासनाला कायमचा आहे..
सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट संस्थान टेंडर काढून महाराष्ट्र सुरक्षा बल व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अशा कर्मचाऱ्यांची भरती करून लाखो रुपयांची उधळण व मासिक खर्च करत असते. अशा खर्चाची उधळण थांबवून स्थानिक ग्रामस्थ तरुण युवकांच्या हाताला काम द्यावे असे सप्तशृंगी गडावरील उपसरपंच संदीप बेनके यांनी आपले मत सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर व जनसंपर्क अधिकारी भिकान वाबळे यांच्याजवळ व्यक्त केले, तसेच
भाविकांची मंदिर गाभाऱ्यामध्ये होणारी हेळसांड ही कदापिक खपून घेतली जाणार नाही ट्रस्ट संस्थान व ग्रामस्थांचा उदरनिर्वाह पूर्णतः भाविकांवर अवलंबून आहे याचा ट्रस्ट प्रशासनाला विसर पडता कामा नये. त्यासाठी उचित व्यवस्थापन व सुसज्जय व्यवस्थापन करावे असे राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष शांताराम गवळी राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष विवेक बेनके सामाजिक कार्यकर्ते मधुकर गवळी,हेमंत निकम,सनी दुबे, इत्यादींनी आपले मत व्यक्त केले.

आई भगवतीच्या दर्शनासाठी भाविकांची रहदारी वर्दळ कायमच असते, ज्यामुळे व्यवस्थापन कोलमडते.
सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट प्रशासनाने मंदिरतील गर्दी नियंत्रणासाठी योग्य ते नियोजन करणे आवश्यक आहे,
जेणेकरून दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांची लोटा लाटी होऊन हेळसांड होणार नाही याची दक्षता घ्यावी,
– अजय दुबे, राष्ट्रवादी उपजिल्हाध्यक्ष

गर्दी उत्सव वेळी भाविकभक्त तासनतास बारी व रेलिंगमध्ये उभे असतात, त्यांच्या अंगा खांद्यावर लहान मुले असतात, काही भाविकांना मधुमेह व इतरत्र त्रास असतो… या सर्व गोष्टींचा ट्रस्ट प्रशासनाने गांभीर्याने विचार करून मंदिर परिसरामध्ये ठीक ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी,
– राजेश गवळी,  ग्रामपंचायत सदस्य

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

18 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

18 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

19 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

19 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

19 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

19 hours ago