मौनव्रत असल्याने माध्यमांना प्रतिक्रिया नाही
पंचवटी : वार्ताहर
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री धनंजय मुंडे हे धार्मिक कार्यक्रमासाठी बुधवारी (दि.4) नाशिकमध्ये होते. सकाळी गोदाघाटावर एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर संध्याकाळी त्यांनी विवाह सोहळ्यासदेखील हजेरी लावली. परंतु, मुंडे यांनी मौनव्रत असल्याचे खुणवत कोणत्याही विषयावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली नाही. इगतपुरीच्या विपश्यना केंद्रातदेखील शेवटच्या दिवशी संवाद कार्यक्रमात सहभाग न घेता त्यांनी मुंबईकडे प्रस्थान केले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांचे समर्थक असलेला आरोपी वाल्मीक कराड व त्याच्या सहकार्यांना बीड पोलिसांनी अटक केली. त्यानंतर विरोधकांनी आणलेल्या दबावामुळे मुंडे यांनादेखील मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर मुंडे हे माध्यमांपासून जरा अंतर राखून असल्याचेच दिसून आले आहे. दरम्यान, दिनांक 3 जून रोजी गोपीनाथ गडावर मुंडे भाऊ-बहीण कार्यक्रमात दिसून आले. तब्बल 11 वर्षांनी ते एकत्र आले होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांशी भावनिक संवाद साधला. यावेळी धनंजय मुंडेदेखील काही बोलतील, अशी अपेक्षा उपस्थितांना होती. परंतु, यावेळी देखील त्यांनी बोलणे टाळले. दोन दिवसांपूर्वीच इगतपुरीतील विपश्यना केंद्रात मुंडे यांनी दहा दिवस ध्यानधारणा केली. परंतु समारोपालादेखील संवाद न साधता मुंबईची वाट धरली होती.
कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट कांद्याचे भाव गडगडणार लासलगाव :- समीर पठाण गेल्या काही दिवसांपासून…
यापूर्वीच्या दोन समित्यांच्या अहवालाचे काय झाले? कांदा संघटनेने अध्यक्ष भारत दिघोळे यांचा सरकारला सवाल नाशिक:…
वधूचा घागरा बदलून न दिल्याने नियोजित वराने केले असे काही.... शहापूर : साजिद शेख…
मृत्यू नंतरही आदिवासींच्या नशिबी पुन्हा मरण यातनाच मोखाडा: नामदेव ठोंमरे मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या…
सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राज्यस्तरीय भव्य अधिवेशन नाशिक प्रतिनिधी सेवा…
नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्यातील पहिला, दुसरा व चौथा श्रावणी सोमवार अनुक्रमे 28 जुलै, 4…