कसबात धनगेकर विजयी
भाजपाच्या बालेकिल्ल्याला महाविकास आघाडीकडून सुरुंग
पुणे: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात महाविकास आघाडीने यश मिळवले आहे, पहिल्या फेरीपासून आघाडी घेतलेल्या रवींद्र धनगेकर यांनी 11040 मतांची आघाडी घेत विजय मिळवल, येथे भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे, 1995 पासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात भाजपचे वर्चस्व होते, मुक्ता टिळक यांच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी न दिल्याचा तसेच ब्राह्मण समाजाला डावल्याचा फटका भाजपाला बसला, धनगेकर यांच्या विजयासाठी शरद पवार, नाना पटोले, अजित पवार, आदित्य ठाकरे यांनी येथे सभा तसेच रोड शो केले, भाजपाने ही जागा राखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याच्या मंत्रिमंडळात असलेल्या अनेक मंत्र्यांनी येथे मुक्काम ठोकला होता, भाजपकडून येथे पैशांचे वाटप केल्याच्या आरोपनी ही निवडणूक गाजली. भाजपच्या प्रभागात देखील धनगेकर यांनीच आघाडी घेतली ,20 व्या फेरीअखेर धनगेकर यांनी 11000 हुन अधिक मतांची आघाडी घेत विजय मिळवला,
मोखाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडली अफूनी भरलेली क्रेटा कार 15 लाखांचा मुद्देमाल जप्त मोखाडा :…
नाशिक: प्रतिनिधी मी ऑनलाइन रमी खेळत नव्हतो, मला खेळता पण येत नाही. मी वेडे वाकडे…
जामीनावर सुटला आणि विनयभंग केलेल्या मुलींच्या दारातच फटाके वाजवून नाच नाच नाचला शहापूर: साजिद शेख…
ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी वैद्यकीय शिक्षण सोडून बनला चोर शहापूर: साजिद शेख ऑनलाईन मोबाइल गेमच्या आहारी…
नांदगावच्या कन्या विद्यालयात कूकर फुटला शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या दोन महिला जखमी नांदगाव: प्रतिनिधी -…
मनमाड: प्रतिनिधी मागील काही दिवसांपूर्वी मनमाड शहरातील सिकंदर नगर भागातील पाच वर्षीय मुलाचे अपहरण करण्याचा…