नाशिक

खंबीर नेतृत्वाचा अभाव, प्रशासकीय अनास्था कारणीभूत औद्योगिक विकासात नाशिक पिछाडीवरच!

खंबीर नेतृत्वाचा अभाव, प्रशासकीय अनास्था कारणीभूत
औद्योगिक विकासात
नाशिक पिछाडीवरच!

निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांची खंत

नाशिक : अश्विनी पांडे
राजकीय खंबीर नेतृत्व आणि प्रशासकीय अनास्था यामुळे नाशिकचा पुणे शहराप्रमाणे औद्योगिक विकास होऊ शकला नाही.काही लोकप्रतिनिधींनी निश्चित योगदान दिले आहे. पण नाशिकचा अद्याप तरी सर्वांगिण औद्योगिक विकास होऊ शकला नसल्याची खंत  नाशिक जिल्हयाच्या  उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पुढाकार घेणारे व उद्योगविश्वात स्वत:चे अढळस्थान निर्माण केलेले उद्योजक निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दै.गांवकरीशी संवाद साधतांना व्यक्त केली.

शिक्षण कुठे झाले?
माझे प्राथमिक शिक्षण पेठे हायस्कूलला झाले. आरवायके  महाविद्यालयातून पुढील शिक्षण घेतले. तर पुण्यातून डिप्लोमा केला.
उद्योजक होण्याच्या प्रवासाला सुरूवात कशी झाली?
कुटुंबात आधी कोणीही उद्योजक नव्हते, पण नोकरी करायची नाही, असे ठरवले होते. त्यामुळे शिक्षण सुरू असतानाच व्यवसाय कोणता करायचा? कसा करायचा? याचे नियोजन सुरू असायचे. दोन मित्रांच्या सहाय्याने 1988 साली भागीदारीमध्ये छोटासा उद्योग सुरू केला. 1991 नंतर स्वतंत्रपणे उद्योगाला सुरूवात केली. त्यानंतर कधी मागे वळून पाहण्याची गरज पडली नाही.
उद्योजक नसतात तर?
मी दहावीत असल्यापासून शिवसेनेचे काम करत होतो. पुढे शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेनेत जिल्हा प्रमुख म्हणूनही काम केले. नाशिक शहर शिवसेनेचा उपप्रमुख होतो. तेव्हापासून समाजकारण, राजकारणाची आवड होती. उद्योजक नसतो तर राजकारण किंवा समाजकारणात असतो.
लग्न कसे जुळले?
मी आणि प्रेरणा एकत्र नाटकात काम करत असताना मैत्री झाली, मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि पुढे जाऊन आम्ही लग्न केले.
कुटूंबासाठी कसा वेळ काढता?
कुटुंबासाठी वेळ काढावा लागत नाही. कारण कुटूंब आणि माझे काम दोन्हीही माझ्यासाठी प्राधान्य असल्याने दोन्ही गोष्टींसाठी वेळेचे बरोबर नियोजन करण्यात येते.
वेळ मिळेल तेव्हा कोणते छंद जोपासता?
क्रिकेट खेळणे व पाहणे, गाणी म्हणणे व ऐकणे, वाचन हे छंद आहेत.
नाशिक शहराचा पुण्याप्रमाणे औद्योगिक विकास का होऊ शकला नाही?
राजकीय खंबीर नेतृत्व आणि प्रशासकीय अनास्था यामुळे नाशिकचा पुणे शहराप्रमाणे विकास होऊ शकला नाही. काही लोकप्रतिनिधींनी निश्चित योगदान दिले आहे. पण नाशिकचा अद्याप तरी सर्वांगिण औद्योगिक विकास झाला नाही.
नवीन उद्योग येण्यासाठी निमाचे काय प्रयत्न सुरू आहेत?
निमा पॉवर प्रदर्शनामध्ये इलेक्ट्रॉनिक मॅनिफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर झाले आहे. हे नाशिकच्या औद्योगिक नगरीची दिशा बदलून टाकणारे आहे. सातत्याने यासाठी पाठपुरावा सुरू आहे. इलेक्ट्रीक टेस्टींग लॅब,कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचा पाठपुरावा केला जात आहे. नुकतेच इन्वेस्ट इंन्डिया या भारत सरकारच्या प्रतिनिधींना नाशिकमध्ये बोलावून प्रेझेंटेशन दिले. येणार्‍या काळात जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीकोनातून अनेक गोष्टींवर काम सुरू आहे.
रोजगार आणि सक्षम कामगार या दोन्हींची सांगड कशी घालणार?
निमाच्यावतीने एक रोजगार मेळावा नियोजित आहे. सध्याची असलेली शिक्षणपध्दती आणि सध्या उद्योगांना लागणार्‍या मनुष्यबळाची गरज या दोन्हींची सांगड बसत नाही. इन्ड्रस्टी इंन्स्ट्यिुड इनट्रॅक्शन अशी एक समिती स्थापन केली आहे. त्यामाध्यातून विद्यार्थ्यांना रोजगारभिमूक शिक्षण देणे, विविध कोर्सेस तयार करणे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स, क्रॅश कोर्स तयार करणे व उद्योगांच्या निकडीप्रमाणे डिग्री डिप्लोमा तयार करून ते मुक्त विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थाच्या माध्यमातून राबवून रोजगाराची संधी निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे.
नवउद्योजकांना काय संदेश द्याल?
सचोटी, जिद्द, गुणवत्ता आपल्या कामाशी प्रामाणिकपणा हे ठेवले तर नक्कीच यश आहे. जमीनीवर पाय ठेऊन स्वप्न पाहिले तर कोणतेही स्वप्न अपूर्ण राहू शकत नाही.

Edit by , ashvini pande

Bhagwat Udavant

View Comments

  • I agree with the views expressed.We are running an industry by name Vibha Corporation for manufacturing HT/LT electrical panels.We ourselves find a perennial shortage of well trained electrical wiremen for our work.I didsome efforts for starting induatry oriented training courses but couldn't get adequate response.I am interested in reviving that effort with the help of NIMA.
    Best wishes for Mr.Bele's efforts.

Recent Posts

गवंडगाव येथे आज चैत्र पाौर्णिमा यात्रोत्सवाचे आयोजन

गवंडगाव येथे चैत्र पाौर्णिमा यात्रोत्सवाचे आयोजन भाविकांनी यात्रात्सोवास येण्याचे  मनुदेवी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र वडनेरे यांचे…

4 hours ago

सातपूर हादरलं; अज्ञात हल्लेखोरांकडून तरुणाचा खून

सातपूर हादरलं; अज्ञात हल्लेखोरांकडून तरुणाचा खून   संशयित आरोपी फरार, पथकाकडून शोध   सातपूर: प्रतिनिधी…

5 hours ago

नाशिकरोड ‘एमपीए’च्या पदाधिकार्‍यांची निवड

नाशिकरोड : वार्ताहर युरेथ्रल स्ट्रिक्चर अत्याधुनिक पद्धतीने शस्रक्रिया कक्षींन आता सुरळीत करता येते. वारंवार यूरेथ्रा…

1 day ago

भव्य शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रमांनी महावीर जयंती साजरी

नाशिकरोड : वार्ताहर जैन धर्माचे 24 वे तीर्थंकार भगवान महावीर यांचा 2624 जन्मकल्याणक म्हणजे जन्मदिन…

1 day ago

नैसर्गिक साधनांचा वापर करत विद्यार्थ्यांनी बनवली 140 घरटी

चिमण्यांसाठी केली दाणापाण्याची सोय, शहा येथील भैरवनाथ विद्यालयाचा पर्यावरणस्नेही उपक्रम सन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील शहा…

1 day ago

पोलीस ठाण्यातच  दोन पोलीस एकमेकांना भिडले नेमके काय कारण घडले?

पोलीस ठाण्यातच  दोन पोलीस एकमेकांना भिडले नेमके काय कारण घडले? सिडको :  विशेष प्रतिनिधी सरकार…

1 day ago