धानोरे येथील सैन्य दलातील जवानाचा अपघाती मृत्यू
लासलगाव: प्रतिनिधी
निफाड तालुक्यातील धानोरे येथील रहिवासी असलेला भारतीय सैन्य दलातील जवान श्रीराम राजेंद्र गुजर (वय – २४)हे सुटीवर गावी आले होते.शिर्डी येथून साईबाबाचे देवदर्शन करून सोनेवाडी (ता.कोपरगाव जि.अहमनगर) येथे नातेवाईकांकडून घरी येत असताना दुचाकी पल्सर गाडीचा अपघात झाला.ही घटना १६ जुलैला दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर पाथरे(ता.सिन्नर) येथे घडली.श्रीराम यांच्या निधनामुळे गावावर शोककळा पसरली असून मंगळवारी दि.१८ रोजी सकाळी ११:०० वाजता श्रीराम यांच्यावर धानोरे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
आसाम(गुवाहाटी) येथे भारतीय सैन्य दलात शिपाई जहाज ऑपरेटर म्हणून कर्तव्यावर होते.पंचवीस दिवसांपूर्वी सुटीवर आलेले श्रीराम राजेंद्र गुजर शिर्डी येथून देवदर्शन करून नातेवाईकांकडून घरी जाण्यासाठी निघाले होते.त्यांच्या पल्सर (एमएच १५. एचए ९००६) मोटरसायकलला समोरून येणाऱ्या प्लॅटिना मोटर सायकलने जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात प्लॅटिनावरील व श्रीराम गंभीर जखमी झाले.श्रीराम यांच्या सोबत असलेला मावसभाऊ अक्षय उर्फ बबलू पांडुरंग जावळे(वय २५. रा. सोनगाव,ता.कोपरगाव) यांना जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर पाथरेचे ग्रामस्थ व पिंपरवाडी टोल नाका मदत पथकाने श्रीराम व अपघातग्रस्तांना शिर्डी येथे साई संस्थान सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.उपचारादम्यान रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात आजोबा संतु,आई अनिता,शेतकरी वडील राजेंद्र,भाऊ नितिन,बहीण प्रियंका असा परिवार आहे.दरम्यान एक महिन्याच्या सुट्टीवर गावी आलेल्या श्रीराम नातेवाईकांना भेटून मंगळवार दि.१८ रोजी आपल्या कर्तव्यावर हजर होण्यासाठी जाणार होते परंतु दुर्दैवाने त्याच्या आतच काळाने घाला घातला.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्रीराम यांनी अतिशय हालकीच्या परिस्थिती आपले शिक्षण पूर्ण केले. दहावीपर्यंतचे शिक्षण रूई येथील न्यू इंग्लिश स्कुल मध्ये घेतले व नंतर बारावीचे शिक्षण विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात पूर्ण करून सैन्यदलात भरती झाले आणि पुणे येथे सेवेला प्रारंभ झाला.श्रीराम हे भारतीय सैन्य दलात बॉम्बे इंजिनिअर कोर २३६ IWT युनिट मध्ये गेल्या सात वर्षांपासून कार्यरत होते.
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…