नाशिकः महाराष्ट शासनाच्या क्रिडा व युवक संचालनालयातर्फे आयोजित नाशिक येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत इनलाईन प्रकारात ध्रुव संतोष दातीर याने प्रथम क्रमांक मिळविला.
पाथर्डी फाटयावरील अश्विन नगर येथील होरायझन इंटरनॅशनल अकॅडमी या शाळेचा तो विद्यार्थी आहे. नंदूरबार येथे होणार्र्या विभागीय क्रीडा स्पर्धेत दातार याची निवड झाली आहे.क्रीडा शिक्षक गिरीष वाघ यांचे त्यास मार्गदर्शन लाभले. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, शिक्षणािधकारी संजय पाटील व मुख्याध्यापक रिचा पेखले यांच्या उपस्थितीत या खेळाडूचा सत्कार करण्यात आला.