धुळे लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरेंना सलग तिसर्यांदा भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. सुभाष भामरे यांच्या मध्यंतरी भाजपाची उमेदवारी मिळेल या अपेक्षेने माझी सनदी पोलीस अधिकारी डॉ.प्रतापराव दिघावकर यांनी जोर लावला होता. परंतु उमेदवारीच्या स्पर्धेत अखेर सुभाष भामरे यांनीच बाजी मारली. डॉ.विलास बच्छावांनी पण आपण उमेदवारी करू शकतो हे ओळखून दिघावकरांप्रमाणेच दौरे केले. धरती देवरे, हषर्र्वर्धन दहिते पण कामाला लागले. बिंदु शर्मा पण उमेदवारी मागू लागले व लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असतात याचा विसरच काहींना पडला व लोकसभा मतदारसंघ ग्रामपंचायतीचा वॉर्ड बनवला.
डॉ. सुभाष भामरे शांत होते. धावाधाव करणार्यांच्या बद्दल ब्रशब्द काढत नव्हते, कारण त्यांची उमेदवारी आपल्या राज्यातील पहिल्याच यादीत जाहीर झाली. यावरूनच डॉ. भामरेंचे पक्षातील वजन लक्षात आले. भाजपाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडून कोण लढणार? असा प्रश्न निर्माण झाला. आ. कुणाल पाटलांनी मुंबईच बरी हे आधीच ठरवले होते. मग राहिले धुळे व नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर व डॉ. तुषार शेवाळे. पण भाजपाचा विषय संपल्यावर डॉ. विलास बच्छावांनी काँग्रेसकडे प्रयत्न केले. खरे तर काँग्रेसने डॉ. तुषार शेवाळेंना वापरून घेतले व हे लक्षात येत असूनही त्यांनी डुबत्या नावेत बसून प्रवास करणे पसंत केले. 2019 ला धुळे लोकसभेसाठी तेच प्रमुख दावेदार होते पण पक्षाने त्यांना नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद देऊन लोकसभेची उमेदवारी आ. कुणाल पाटलांना दिली. नंतर ना. दादा भुसेंसारख्या तगड्या उमेदवारासमोर डॉ.तुषार शेवाळेंना काँग्रेसने उतरवले. त्यांचा पराभव झाला. वरून त्यांच्यावर खरे का खोटे देवजाणो बेछूट आरोप झाले. आता काँग्रेसने दहा वर्षांपासून सक्रिय नसलेल्या नाशिकच्याच झालेल्या डॉ. शोभा बच्छाव ज्या धुळे मतदारसंघात खरंच आयात वाटतात त्यांना उमेदवारी देऊन स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. त्यांच्या उमेदवारीने संतापाची लाट आली. एकाच वेळी दोन जिल्हाध्यक्षपदाचा त्याग करून उमेदवारीचा निषेध करतात. मालेगाव काँग्रेस कमिटी कार्यालयात जोरदार निषेधाचा सामना डॉ. शोभाताईंना करावा लागला. मग मतदारांसमोर जातील कशा? हे स्वतःच्या जिल्ह्यात तर धुळे एकदम परका जिल्हा तेथे तर भयंकर वाईट अनुभव येईल. बागलाणात काँग्रेसचे अस्तित्वच नाममात्र आहे. मालेगावात आलेला अनुभव भयंकर वाईट. धुळे जिल्हा तर धुळ्यातील उमेदवार पक्ष न बघता आपला म्हणून भाजपाचे कमळच जवळ करतील. मग काँग्रेसला मते मिळतील मुस्लिम समाजाची तेथेही अब्दुल रहेमान हे वंचितचे मुस्लिम उमेदवार आहेत. रमजान संपला असल्याने ओवेसी तगडा मुस्लिम उमेदवार देतीलच. कारण धुळे व मालेगावात त्यांचे आमदार आहेत ते जागा सोडणारच नाहीत किंवा वंचितला साथ देतील व लाखभर मते घेतील.
आ. जयकुमार रावलांचे शिंदखेड्यातील एकतर्फी प्रस्त तेथे डॉ.सुभाष भामरे लोकप्रिय आहेत. तेथे नाशिकच्या डॉ. शोभाताईंना किती मते मिळतील, धुळे ग्रामीण आ. कुणाल पाटलांना आमदार तर डॉ. भामरेंना खासदार करतात. धुळे शहर शेवटी डॉ.सुभाषबाबा धुळ्याचेच मग मतदार कुणाला ओळखतील. मालेगाव मध्य भाजपा पिछाडीत तर काँग्रेस वंचित व ओवेसी मतांचे वाटप होईल. मालेगाव बाह्य ना. दादा भुसे युती धर्माप्रमाणे भाजपासोबत व काँग्रेसने तर डॉ. शोभाताईंची केलेली ‘शोभा’ सोशल मीडियावर सतत फिरत आहे. नातेगोते वगळता डॉ.शोभाताईंना कुणीच साथ देणार नाही. राजकारणात कमाईसाठी गावागावात टपून बसलेले बोके दुबळ्या उमेदवाराकडे जात नाहीत. अमरीश पटेलांनी दोन वेळा अनेक बोके मालामाल केले पण त्यांना फसवले. जेथे आ. पटेलांना मतदारसंघाने स्वीकारले नाही तेथे कुणाचाच टिकाव यंदा तरी लागणार नाही.पण शांत स्वभाव धुळे मतदारसंघातील कोरी पाटी, महिला नातेगोते व डॉ.सुभाष भामरेंच्या छुप्या विरोधकांना मत द्यायला मिळालेले व्यासपीठ बघता व निवडणुकीला वेळ याचा मोठा परिणाम कदाचित एकतर्फी वाटणारी निवडणूक भाजपाला जड जाऊ शकते.
आरोग्य राज्यमंत्री असताना डॉ. शोभा बच्छाव धुळ्याच्या पालकमंत्री होत्या. त्यामुळे धुळेकरांचा चांगला परिचय आहे. काही आमदारांचा भाजपाला छुपा विरोध आहे हे नक्की. भाजपा वरचढ आहे पण अडचणी पण खूप आहेत. खरे तर भाजपा व काँग्रेसच्या उमेदवारांना स्वपक्षातूनच विरोध वाढत आहे. टक्केवारी हे डॉ. सुभाष भामरेंना विरोधाचे खरे कारण आहे. काँग्रेसच्या डॉ.शोभा बच्छाव अचानक अवतरल्यामुळे उमेदवारीचा सातबारा आमचा समजणारे संतापले आहेत. कासवगतीने निघालेल्या काँग्रेसला शेतकर्यांची नाराजी फायदा करू शकते असे वाटू लागते पण मोदींचा करिष्मा गरिबांना दिलेले मोठे आर्थिक लाभ हे फॅक्टरही दुर्लक्षून चालणार नाही.