नाशिक ः देवयानी सोनार
उच्चवर्गीय तरुणी महिलांमध्येही धुम्रपानाचे प्रमाण वाढत असून, स्टेटस सिम्बॉल म्हणून,संगतीचा परिणाम,कामाचा ताण,स्पर्धात्मक वातावरण,नकारात्मक विचार,आग्रहाखातर सुरू केलेल्या धुम्रपानाचे दूरगामी परिणाम दिसत आहेत. धूम्रपानामुळे गर्भावरही परिणाम होतो, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.
मध्यम किंवा साधारण परिस्थिती असलेल्या वर्गातील मुली, महिलांचे धुम्रपानाचे प्रमाण किंवा सवयी उच्च वर्गीयांच्या तुलनेत कमीच असल्याचे चित्र आहे. गरोदरपणात केलेल्या कोणत्याही प्रकारच्या व्यसनाचा गर्भावरही दुष्परिणाम दिसून येतो. बाळाची वाढ, पोषक घटक मिळत नाही. धुम्रपानामुळे कर्करोगाची शक्यता असूनही सर्रास धुम्रपान करणार्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. व्यसनापासून मुक्त होण्यासाठी देखील औषधे उपलब्ध केले असले तरी धुम्रपान करणार्यांवर त्याचा फारसा परिणाम झालेला दिसून येत नाही.व्यसन सुटावे म्हणून स्वतःहून प्रयत्न करणार्यांचे माण कमी आहे.तर स्टेटस सिंम्बॉल म्हणून मिरविणार्या तरूणाबरोबरच तरुणीही मागे नाहीत. धु्रमपानामुळे इतर आजारही बळावत आहेत. याबाबत जनजागृती होत असतानाही देशात 24.3 टक्के पुरुष आणि 2.9 टक्के महिला तंबाखूचे सेवन करीत आहेत. दरवर्षी एक जानेवारी हा जागतिक धूम्रपान विरोधी दिन म्हणून पाळला जातो. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम दिसत असतानाही गेल्या कित्येक वर्षांपासून भारतीय माणसाच्या जगण्याशी, संस्कृतीशी जुळलेल्या तंबाखूला प्रतिबंध करणे शक्य झालेले नाही. तरुणांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण वाढत असल्याचे आाढळून आले आहे. मालिका,सिनेमांमध्येही धुम्रपान करू नये याबाबत जनजागृती केली जाते. सिगारेट तंबाखुजन्य पदार्थांवर सावधानीचा इशारा ठळक केला असूनही कानाडोळा केला जात आहे. तरुणाईसह मध्यम,ज्येष्ठांमध्येही धुम्रपान करण्याचे प्रमाण जास्त आहे.
धुम्रपानाच्या सवयीमुळे बाळाची वाढ खंुंटते,पोषक घटक बाळास मिळण्यास अडथळे येतात.सिगारेटमधील घातक द्रव्यामुळे गर्भवती महिलेला त्रास होवू शकतो.गर्भारपणात केलेले कोणतेही व्यसन हानीकारकच असते.
– डॉ.चेतना दहिवेलकर(स्त्रीरोगतज्ज्ञ)
उच्चवर्गीय महिला मुलींमध्ये धु्रमपानाचे प्रमाण अधिक आहे. धुम्रपानामुळे गर्भपात,मुदतपूर्व प्रसुती,रक्तस्त्राव,कमी जन्मलेली बाळ लहान मुलांमध्ये ङ्गाटलेले ओठ आणि टाळू यासारख्या विकृती निर्माण होवू शकतात.
– डॉ.नलिनी बागूल(स्त्रीरोगतज्ज्ञ)
फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…
लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…
हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…
मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…
देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…
शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…