मधु मंगेश कर्णिक : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन
नाशिक : प्रतिनिधी
बोलीभाषा हे महाराष्ट्राचे वैभव आहे. याच बोलीभाषांनी मराठी भाषेला समृद्ध आणि संपन्न केले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी येथे केले.
चौथे विश्व मराठी संमेलन 27 फेब्रुवारीपासून मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात होत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. 26) बोलीभाषांचा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाचे उद्घाटन कर्णिक यांच्या हस्ते महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचे शुक्रवारी (दि. 27) उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस तथा स्वागताध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, मराठी भाषा विकास विभागाचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. मिलिंद जोशी, विश्वास ठाकूर आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला.
श्री. कर्णिक म्हणाले की, महाराष्ट्र हे साहित्य, कला, संगीताला महत्त्व देणारे राज्य आहे. हजारो वर्षांपासून बोलीभाषा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या आहेत. बोलीभाषेला महत्त्व दिले तर मराठी भाषा समृद्ध होईल. राज्य शासनाने सुरू केलेल्या या महोत्सवाच्या माध्यमातून मराठी भाषा समृद्ध होण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
मंत्र्यांची मांदियाळी…
शुक्रवारी (दि.27) दुपारी 3 वाजता विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन आणि मराठी भाषा विभागाचे पुरस्कार वितरण समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पुरस्कारांचे वितरण
मराठी विश्व संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. भालचंद्र नेमाडे यांना साहित्यभूषण, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव, तर शांतिब्रह्म, गुरुवर्य मारुतीबाबा कुरेकर यांना विश्व मराठी संमेलनाच्या विशेष पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
Dialects are the glory of Maharashtra
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…