नाशिक

कोरोनाची लस घेतली ना?

नाशिक ः देवयानी सोनार
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने नागरिकांची धास्ती वाढविली आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम, सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ आणि कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक बूस्टर डोसकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना चाचण्या, केंद्रे, कोविड सेंटर वाढविण्यात येणार आहे.
त्यामुळे इतके दिवस कोरोनाच्या बूस्टर डोसकडे पाठ ङ्गिरविण्यात आली होती. परंतु कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांची  राहिलेल्या पहिल्या, दुसर्‍या डोससह बूस्टर डोस घेण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी सोमवारपासून केंद्रे, चाचण्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती दिली. कोरोनाच्या लाटेचे पुनश्‍च हरिओम चीनमध्ये झाल्याने जगभराची चिंता वाढली आहे. भारतातील लसीकरणाचा वेग आणि लसीकरणाचे उच्चांक गाठून विक्रम केला आहे. नाशिककरांनी बूस्टर डोस घेण्याकडे पाठ ङ्गिरविली असल्याचे चित्र आहे. पहिला डोस घेणार्‍यांचे प्रमाण 89 टक्के, दुसरा डोस 79 टक्के तर बूस्टर डोस घेणार्‍यांचे प्रमाण केवळ 25 टक्के आतापर्यंत नोंदविण्यात आले आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा एकदा जगाची चिंता वाढविली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून देशातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्यास सांगण्यात आले आहे.

अवघे 25 टक्के प्रमाण
बूस्टर डोस सहा महिन्यांनंतर सुरू झाला. तोपर्यंत कोरोना उतरणीला लागल्याने नागरिकांचा निष्काळजीपणा वाढला. त्यामुळे बूस्टर डोस घेण्याचे प्रमाण कमी झाले. पहिला आणि दुसरा डोस घेण्याचे प्रमाण 80 ते 90 टक्के झाले. त्यामानाने बूस्टरचे केवळ 25 टक्के प्रमाण आहे. चीनमध्ये कोरोना वाढल्याने भारतातही आरोग्य यंत्रणा ऍलर्ट मोडवर आली आहे. परिणामी, बूस्टर डोस घेणार्‍यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
आपल्याकडे केसेस कमी आहेत. सोमवारपासून लसीकरण वाढविणार आहे. कोव्हॅक्सिन लस उपलब्ध आहे. कोविशिल्डची मागणी केली आहे. लसीकरण आणि चाचण्या वाढविण्यात येणार आहे. केसेस वाढल्यास खबरदारीचा उपाय म्हणून नियोजन सुरू आहे. सध्या बारा केंद्रे सुरू आहेत. सोमवारनंतर वाढविण्यात येणार आहेत. कोविड सेंटरची तयारी सुरू आहे. बूस्टर डोस घेण्याकडे नागरिकंाची गर्दी होण्याची शक्यता आहे. ज्या नागरिकांचा पहिला, दुसरा किंवा बूस्टर डोस बाकी आहे तो पूर्ण घ्यावा, मास्कचा वापर करावा. लक्षणे तपासून उपचार घ्या. घाबरून जाऊ नका. जिल्हा आरोग्य केंद्र, पालिका, आरोग्य केंद्र, शहर-जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व केंद्रांत लसी उपलब्ध आहेत.
– डॉ. हर्षल नेहते,
जिल्हा आरोग्य अधिकारी

Ashvini Pande

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

10 hours ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

17 hours ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

2 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

3 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

3 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

3 days ago