तरुण

दिल पे मत ले यार..!

टेन्शन, डिप्रेशन आणि त्यातून क्वचितप्रसंगी उचललं जाणारं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल. अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला सतत घडत आहेत. मन हे दिसत नसले तरी जाणवते. त्यामुळे मनाच्या विरुद्ध काही होऊ नये असे प्रत्येकालाच वाटते. सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या व्हाव्यात, ही सर्वांचीच इच्छा असते. पण, सर्वच इच्छा पूर्ण झाल्या तर जगण्याला काय अर्थ आहे.

थोडं पूर्ण, थोडं अपूर्ण असते म्हणून तर ते आयुष्य असते. मात्र, आजच्या काळात सर्वच गोष्टी एका क्लिकवर मिळत असल्याने गांभीर्य राहिले नाही. जर त्या गोष्टी नाही मिळाल्या तर मात्र खूप जास्त दुःख, निराशा पदरी पडते आणि त्यातूनच टोकाचं पाऊल उचललं जात. साध्या साध्या गोष्टी मनावर घेऊन आयुष्याला पूर्णविराम दिला जातो. जगण्यापेक्षा मरण खूप सोपं आहे, असंच आजच्या तरुण पिढीला वाटत आहे. आयुष्यात येणार्‍या संकटात झगडत आयुष्याचे मार्गक्रमण करणे जणू आजच्या तरुणवर्गाला न पटणारे आहे. त्यामुळेच प्रेम, करिअर यांसारख्या बाबतीत अपयश आले की, आत्महत्याला कवटाळणे हा जणू चंगच बांधला आहे. त्यामुळे साध्या साध्या गोष्टीसाठी आत्महत्या केल्याच्या घटना घडत आहेत.आजच्या तरुण पिढीसमोर अनेक आव्हाने आहेत.सध्याचे स्पर्धात्मक आयुष्य आणि व्यक्तिगत आयुष्यात शिक्षणातील स्पर्धा, प्रेमातील अपयश, नोकरी न मिळणे, अर्थिक चणचण यामुळे लहान वयातच चिंतेने तरुणाई ग्रासली जात आहे. त्यातच गॅझेटचा अति वापर व्हर्च्युअल जगात रमणारी तरुणाई प्रत्यक्षात मात्र अबोल आणि न व्यक्त होणारी आहे. याच अबोलपणाचे पर्यवसान पुढे आत्महत्यासारख्या घटनांत घडत आहे.चिंता ही प्रत्येकाच्या आयुष्यात असते. पण प्रत्येक संकटाला मार्ग असतो. पण हा मार्ग काढण्यासाठी आई -वडील, मित्र-मैत्रिणी यांच्यासमोर व्यक्त होणे गरजेचे आहे. अपयश पचवण्याची मानसिकता आजकालच्या तरुण पिढीत कमी असल्याची जाणवते. म्हणूनच असं टोकाचं पाऊल उचलण्याइतपत हिंमत तरुणवर्गात दिसते. एखाद्या बाबतीत चिंता सतावत असेल तर आपल्या प्रियजनांशी संवाद साधणं आणि त्यांची
मनःस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. आपलं मन अनेकदा दुखावलं जातं. त्याची कारणं अनेक असतात, कधी कौटुंबिक कलहांमुळे, शैक्षणिक किंवा नोकरीतील अडचणींमुळे तर कधी इतर नात्यांमधील वादविवाद अशा अनेक गोष्टींचा फरक आपल्या आरोग्यावर पडतो. या सर्व विचारांनी गोंधळून जाऊन अनेकदा तरुण आत्महत्या करतात. तरुणाई सोशल मीडियावरच्या आभासी दुनियेलाच खरी दुनिया मानून जगते. त्यामुळे त्या आभासी दुनियेत जरा चलबिचल झाली तरी त्यांच्या मनाची चलबिचल सुरू होते. वाढती स्पर्धा, वेगवान जीवनशैली, प्रत्येकाची पोटापाण्यासाठीची धडपड, स्वतःच्या प्रगतीसाठी चढाओढ याच्या नादात आपल्या माणसांकरिता पुरेसा वेळ नसतो आणि मग संवादाच्या अभावामुळे टोकाचे निर्णय घेतले जातात.संकटं ही नवीन उमेद घेऊन येतात असे मानले जाते. याच उक्तीचा विचार तरुणवर्गाने करायला हवा. कोणतीही गोष्ट अंतिम नसते. त्यामुळे मनाला न पटणार्‍या घडल्या की, आत्महत्या करण्याऐवजी त्यातून मार्ग काढणे गरजेचे आहे. त्यासाठी क्षुल्लक गोष्टी मनावर न घेता जीवनाचा आनंद घेणे गरजेचे आहे.

  अश्विनी पांडे

Editorial Team

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

4 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

5 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

5 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

5 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

5 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

5 hours ago