मविप्रचे माजी संचालक दिलीप दादा पाटील कालवश.
मनमाड(प्रतिनिधी):- नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे माजी संचालक, मनमाड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, युवक क्रांती गणेश मंडळाचे आधारस्तंभ दिलीपदादा पाटील यांचे रात्री 1 वाजता दुःखद निधन झाले, त्यांची अंत्ययात्रा दि.6/3/2024 रोजी सकाळी 11:30 वाजता राहत्या घरापासून निघेल.
दिलीप पाटील हे मनमाड शहरातील नव्हे तर नांदगाव तालुक्यातील मातब्बर राजकारणी होते.स्वतः दिलीप पाटील यांच्यापासुन सुरू झालेला राजकीय प्रवास आजही सुरू आहे त्यांचे बंधू स्वर्गीय प्रवीण पाटील कैलास पाटील मुलगा योगेश पाटील यांच्यामार्फत आजही सुरूच आहे दिलीप पाटील यांनी त्यांच्या काळात अनेक उपक्रम राबविले आहेत राजकीय शैक्षणिक समाजिक क्षेत्रात त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे.असा हा राजकीय बहुआयामी व्यक्ती आज आपल्याला सोडून गेला आहे