हरिनामाच्या जयघोषात दिंड्या आणि पालख्यांचे शहरात स्वागत

नाशिक (NASHIK)  ःप्रतिनिधी

शहराच्या मुख्य प्रवेशमार्गांवर गेल्या दोन तिन दिवसांपासून अनेक लहान मोठ्या दिंड्या दाखल होत आहे.गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या संत निवृत्तीनाथ ांच्या पौषवारीला वारकर्‍यांची उत्स्ङ्गुर्त हजेरी असते.कोरोनामुळे वारीला ब्रेक लागला होता.यंदा वारीसाठी वारकर्‍यांचा उत्साह शिगेला पोहचला असून शहरात ठिकठिकाणी पालकींचे स्वागत केले जात आहे.पालखी,यात्रा मार्गावर अनेकांनी वारकर्‍यांना नाष्टा,जेवण,पाणी विसाव्याची सोय करून खारीचा वाटा उचलला आहे.

 

हेही वाचा:निमा सरचिटणीस पदी राजेंद्र अहिरे

त्रंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ यात्रेनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातून शहरात टाळमृदंगाच्या गजरात अनेक दिंड्यांचे आगमन होत आहे.शहर आणि उपनगरातील त्रंबकवारीचे रस्ते वारकर्‍यांनी गजबजले असून हरिनामाचा जयघोष दुमदुमत आहे.रस्त्याने महिला पुरूष वारकरी हाता टाळ,मृदंग,झेंडा,तुळशीवृंदवन हाती धरून मार्गस्थ होत आहे.
राज्यातील अनेक भागांमधुन मानाच्या पालख्यांसह अनेक छोट्या मोठ्या पालख्यांचे आगमन होत आहे.शेगावची गजानन महाराजांची पालखी,जळगावहून मुक्ताबाईंची पालखी,आळंदीहून ज्ञानोबा रायांची पालखी आदी मुख्य पालख्यांसह चारशे ते साडेचारशे दिंड्यांचे आगमन झाले असून पाचशे दिंड्यांचा अंदाज आणि तीन लाखांहून अधिक वारकरी येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

हेही वाचा :संत निवृत्तीनाथांच्या पौषवारी साठी प्रशासनाची तयारी

वारकर्‍यांच्या सोयीसाठी अनेक दानशुरांनी हात पुढे करीत पाणी,जेवण आणि इतर सुविधा करून दिल्या जात आहे.दि.20 शुक्रवारपर्यंत संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा होणार आहे.या यात्रेसाठी जिल्ह्यासह राज्यभरातून दिंड्या दाखल होत आहेत.लाखोंच्या वर वारकरी येणार असल्याने प्रशासनाने सज्जता केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *